---Advertisement---

अर्जुन तेंडूलकरचे मुंबई संघाकडून पदार्पण, इंग्लंडच्या ‘या’ महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा

On: रविवार, जानेवारी 17, 2021 10:06 AM
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना शुक्रवारी (१५ जानेवारी) मुंबई विरुद्ध हरियाणा संघात झाला. या सामन्याद्वारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याचे मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. त्यानंतर चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यात इंग्लंड महिला क्रिकेट संघाची सलामीवीर डॅनियल वॅट हिचादेखील समावेश आहे.

डॅनियल वॅटने दिल्या अर्जुनला शुभेच्छा

२१ वर्षीय अर्जुन हा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू आहे. हरियाणाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनला ११व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. मात्र त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. असे असले तरी, गोलंदाजी करताना त्याने डावातील चौथ्या षटकातच हरियाणाचा सलामीवीर चैतन्य बिश्नोईची विकेट घेतली. अवघ्या ४ धावांवर त्याने यष्टीरक्षक आदित्य तरेच्या हातून बिश्नोईला झेलबाद केले होते.

यानंतर एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट करत अर्जुनची प्रशंसा केली. “मुंबई संघाच्या जर्सीत अर्जुनने ४ धावांवर चैतन्य बिश्नोईची पहिली विकेट घेतली आहे. या सामन्यातील पहिल्या षटकात त्याने १५ धावा दिल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनचे हे शानदार पुनरागमन ठरले आहे”, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

यावर प्रतिक्रिया देत डॅनियल हिने लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा अर्जुन! अप्रतिम सुरुवात.” सोबतच तिने सलाम करतानाचे आणि हसतानाचे इमोजी टाकले आहेत.

अर्जुनसोबत डिनर डेटचे फोटो झाले होते व्हायरल

डॅनियल ही भारतीय क्रिकेट संघाची मोठी चाहती आहे. ती बऱ्याचदा भारतीय संघाच्या सामना विजयानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असते. मात्र २०१८ मध्ये ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली होती. त्यावेळी अर्जुनसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये दोघे डिनर डेटवर गेले असल्याचे दिसत होते. तसेच अर्जूनने अनेकदा वॅट त्याची आवडती महिला क्रिकेटपटू असल्याचे सांगितले आहे.

एवढेच नव्हे तर, डॅनियल २०१४ मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याला प्रपोज केल्या कारणाने चर्चेचा विषय ठरली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ संघाचे नेतृत्व करणारा क्रिकेटर ठरला २१ व्या शतकात जन्मलेला पहिलाच भारतीय कर्णधार

सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचे मुंबई संघाकडून पदार्पण; बाप-लेकाच्या नावावर झाला खास रेकॉर्ड

अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---