वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी आणि वनडे मालिका संपली असून उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने देखील आपले मत व्यक्त केले.
टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. भारतीय संघ व्यवस्थापन व कर्णधार यांनी घेतलेले काही निर्णय अत्यंत समजण्यापलीकडचे होते. अशात भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या रणनीतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना दानिश म्हणाला,
“राहुल द्रविड एक महान खेळाडू आणि चांगला प्रशिक्षक नक्कीच आहे. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे योग्य वाटत नाही. त्याचा स्वभाव हा अत्यंत मवाळ असून, टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक स्वभाव व रणनितीची आवश्यकता असते. आपण आयपीएलमध्ये पाहतो की आशिष नेहरा नेहमी खेळाडूशी संवाद साधत असतो.”
राहुल द्रविड यांच्या आज मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मागील वर्षी टी20 विश्वचषकात सहभाग नोंदवला होता. मात्र, भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतरही भारतीय संघाच्या टी20 प्रशिक्षक पदी दुसऱ्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत होती. द्रविड यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंतच असून, भारतीय संघ अपेक्षित कामगिरी करू न शकल्यास त्यांना पदावरून मुक्त केले जाऊ शकते.
(Danish Kaneria Said Rahul Dravid Won’t Able For T20 Mentoring)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया