पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर आपल्या कारकिर्दीदरम्यान गैरवर्तन करण्याचा आरोप केला आहे. दानिशने काल (१६ मे) पिटीआयशी म्हटले आहे की, अष्टपैलू क्रिकेटपटू आफ्रिदीमुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची जास्त संधी देण्यात आली नव्हती. Danish Kaneriya blames shahid afridi for ruining his odi career.
दानिशला जेव्हा विचारण्यात आले की, धार्मिक भेदभावामुळे तुझ्यासोबत हा अन्याय झाला आहे असे तुला वाटते का? यावर उत्तर देत दानिश म्हणाला की, “जेव्हा आम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच संघातून खेळत होतो किंवा आंतरराष्ट्रीय वनडे संघाचा भाग होतो, तेव्हा आफ्रिदी नेहमी माझ्या विरोधात असायचा. जर प्रत्येक वेळी एखादी व्यक्ति आपल्या विरुद्ध असेल तर, यामागचे कारण धर्माव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नसणार.”
एवढेच नाही तर, गतवर्षी शोएब अख्तरने या गोष्टीचे समर्थन केले होते की, धर्मामुळे दानिश संघात असताना त्याच्यासोबत दुर्व्यवहार केला जात असायचा. दानिशने म्हटले आहे की, “जर आफ्रिदी संघात नसता तर त्याने १९पेक्षा जास्त वनडे सामने खेळले असते. मी फक्त आफ्रिदीमुळे जास्त वनडे सामने खेळू शकतो नाही. जेव्हा मी देशांतर्गत क्रिकेट खेळत असायचो तेव्हा तो माझ्या संघाचा कर्णधार होता. तो नेहमी मला संघातबाहेर ठेवत असायचा.एवढेच नाही तर, वनडेतही तो माझ्यासोबत असेच करत असायचा. तो मला विनाकारण संघाबाहेर ठेवत असायचा.”
दानिश बराच काळ पाकिस्तानी संघाचा भाग होता. पण, कारकिर्दीच्या शेवटी मात्र त्याला संघातील अकरा जणांमध्ये स्थान मिळाले नाही. तो म्हणाला की, “आफ्रिदी दुसऱ्यांचे समर्थन करत असायचा पण तो कधीच माझी बाजू घेत नसायचा. देवाची कृपा आहे की, असे असले तरी मला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली. याचा मला गर्व वाटतो.”
दानिश पुढे बोलताना म्हणाला की, “याबरोबरच मला संघाबाहेर ठेवण्याचे आफ्रिदीचे दुसरे कारण हे होते की, मी आणि तो दोघेही लेग स्पिन गोलंदाज होतो. तो तसाही मोठा खेळाडू होता. तरी त्याचे माझ्यासोबतचे वागणूक का अशी होती? ते मला समजले नाही. आफ्रिदीने म्हटले होते की, एका संघात २ फिरकी गोलंदाज खेळू शकत नाहीत. शिवाय त्याने माझ्या क्षेत्ररक्षणावरही प्रश्न उपस्थित केले होते. विशेष म्हणजे, जेव्हा एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर काढले जाते. तेव्हा त्याला देशांतर्गत संघातही स्थान दिले जात नाही.”
दानिश २००९ला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असताना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे तो बऱ्याच काळापासून पीसीबीला मदत मागत आहे. त्याला पाकिस्तान संघात पुनरागमन करायचे आहे.
दानिश याविषयी बोलताना म्हणाला की, “मला धर्माविषयीचे प्रकरण मोठे करायचे नाही. मला फक्त पीसीबीचे समर्थन हवे. जर तुम्ही मोहम्मद आमिर, सलमान बट यांना संघात घेऊ शकता तर मला का नाही. हा मी चुक केली आहे. पण दुसऱ्यांना संधी देण्यात आल्या तर मलाही द्यावी. त्यांनी मला समर्थन करायला पाहिजे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
खुशखबर! टी-20 विश्वचषकाऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएल
धोनीला आयपीएलमध्ये बाद केलं म्हणून मला चेन्नईविरुद्ध पुढच्या सामन्यात…
टीम इंडियाचे अनेक खेळाडू अडकले आहेत मुंबई व बेंलगोर शहरात