पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर काही काळापासून सतत चर्चेत आहे. आमिरने नुकतेच भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याच्याबाबतीत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याची चर्चा होत असताना अन्य एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने आमिरला खडे बोल सुनावले आहेत. रोहित दिग्गज असून, तुझा हा दर्जा नसल्याचे हा क्रिकेटपटू म्हणाला.
माजी फिरकीपटूची टीका
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला बाद करणे माझ्यासाठी अगदी सोपे आहे व मी त्याला नेहमीच त्रस्त करत आलो आहे, असे विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलेच धारेवर धरले गेले. आता या साखळीत आणखी एक नाव जोडले गेले आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने याबाबतीत आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले, “आमिर तुला नेहमी चर्चेत राहायला आवडते. आता ना भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मालिका आहे, ना तुला रोहित विरुद्ध गोलंदाजी करायची आहे. रोहितला हिटमॅन म्हटले जाते. याचा अर्थ तो वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोघांना उत्तमरित्या खेळून काढू शकतो.”
तुझा तो दर्जा नाही
कनेरियाने आपली बात पुढे नेताना म्हटले, “तुझ्याबद्दल बोलायचे झाले तर आता ना तुझा स्विंग राहिला आहे ना वेग. असदच्या खराब कामगिरीमुळे तुला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. रोहित तुझ्यापेक्षा खूप पुढे आहे. त्याची मोजदाद दिग्गजांमध्ये होते आणि तुझा तो दर्जा नाही. भूतकाळात तू त्याला बाद केले असशील. मात्र, आता तुझा आणि त्याचा सामना होणार नसल्याने तू अशी वक्तव्ये करू नये.”
दानिश कनेरिया याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा प्रतिनिधीत्व केले आहे. निवृत्तीनंतर तो वारंवार पाकिस्तानच्या खेळाडूंना लक्ष करताना दिसून येतो.
महत्त्वाच्या बातम्या –
जावईप्रेम! भावी सासरे दुखापतग्रस्त झाल्यामुळे शाहिन आफिद्री हळहळला, देवाकडे केली प्रार्थना
तो अनेकदा मैदानात येण्यापुर्वी सिगारेट ओढायचा; संघ सहकाऱ्याकडून माजी क्रिकेटरची ‘पोलखोल’