---Advertisement---

जावईप्रेम! भावी सासरे दुखापतग्रस्त झाल्यामुळे शाहिन आफिद्री हळहळला, देवाकडे केली प्रार्थना

On: मंगळवार, मे 25, 2021 2:39 PM
---Advertisement---

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा फटका पाकिस्तान सुपर लीगलाही बसला होता. या लीगमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही काळासाठी पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम हंगाम स्थगित करण्यात आला होता. परंतु येत्या काही दिवसात अबू धाबीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचा दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी मैदानात सराव करताना दिसून आला होता.

परंतु सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये. अशातच त्याच्या होणाऱ्या जावयाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे.

शाहिद आफ्रिदीने वयाची चाळिशी ओलांडली असली तरीदेखील तो मैदानावर त्याच जोशमध्ये खेळताना दिसून येतो. आपली फिरकी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अशातच पाकिस्तान सुपर लीग २०२१ (पीएसएल)मधील उर्वरित सामन्यांसाठी सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती, ज्याचा त्याला जबर फटका बसला आहे. तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “पीएसएलच्या उर्वरित सामन्यांचा सराव करत असताना माझ्या कंबरेच्या खाली वेदना जाणवू लागल्या होत्या. म्हणून मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. दुर्दैवाने मला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणून मी आता माझा संघ मुलतान सुलतानचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीये. यामुळे माझे हृदय तुटले आहे, कारण मी सराव करीत होतो आणि प्रशिक्षण चांगले सुरू होते.”

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1396822419940290562?s=20

होणाऱ्या जावयाने केली प्रार्थना
शाहिद आफ्रिदी पीएसएल स्पर्धेतून बाहेर होण्याची बातमी मिळताच त्याच्या होणाऱ्या जावयाला राहावले नाही. शाहीन शाह आफ्रिदीने ट्विट करत आपल्या सासऱ्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “लवकर ठीक व्हा लाला.. तुम्ही पाकिस्तान संघाचे गौरव आहात. आम्हाला पीएसएल स्पर्धेत तुमची कमतरता जाणवेल.”

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदी आणि अक्सा आफ्रिदी यांचा विवाह होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नुकताच शाहिदने या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. लवकरच शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदी आणि शाहीन आफ्रिदी यांचा विवाह होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तो अनेकदा मैदानात येण्यापुर्वी सिगारेट ओढायचा; संघ सहकाऱ्याकडून माजी क्रिकेटरची ‘पोलखोल’

आयपीएल दरम्यान ‘या’ सौंदर्यवतीवर आलं होतं धोनीचं मन, तीसुद्धा होती लग्नासाठी तयार!

“सामना संपल्यानंतर तो माझ्यासोबत…,” विराटच्या आयपीएल २०२०मधील स्लेजिंगवर सूर्यकुमारची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---