भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आणि स्वतःचे व देशाचे नाव उंचावले. धोनीनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो चाहत्यांच्या मनात घर करून आहे. चाहत्यांकडून जितके धोनीला मैदानावर असताना प्रेम मिळते, तितकेच प्रेम मैदानाबाहेरही मिळते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.
धोनी जेव्हा युवा वयात होता आणि त्याने भारतीय संघात पहिले पाऊल टाकले होते, त्यावेळी अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या. परंतु आपणा सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, धोनीदेखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मुलींवर फिदा झाला होता. परंतु काही अपवाद सोडले तर इतरांसोबत त्याचे नाते जास्त दिवस टिकले नाही.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला धोनी आयपीएल दरम्यान एका सुंदर मुलीवर प्रेम करत होता. ती मुलगी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड ॲम्बेसिडर आणि साऊथ चित्रपटातील अभिनेत्री रॉय लक्ष्मी ही होती. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात धोनीचे तिच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चेने जोर पकडला होता. याचा खुलासा अभिनेत्रीने स्वतःच केला होता. रॉय लक्ष्मीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “जर धोनीने मला लग्नासाठी विचारले असते, तर मी लग्न करायला तयार होते.”
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल 2008 च्या दरम्यान धोनी खोटे बोलून बऱ्याचदा रॉय लक्ष्मीला भेटायला जात असे. याविषयी एका खेळाडूने होते सांगितले की, “आयपीएल दरम्यान धोनी 45 दिवसांत 4 वेळा चेन्नईला जात असायचा.” परंतु धोनी आणि रॉय लक्ष्मी यांचे अफेअर फक्त एक वर्ष चालले. त्यानंतर दोघांनीही स्वत:चे वेगळे मार्ग निवडले.
यानंतर एकदा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत धोनीसोबतच्या नात्यावर विचारलेल्या प्रश्नांवर रॉय लक्ष्मी भडकली होती. ती म्हणाली होती की, “मला नाही समजत लोकांकडे इतका वेळ कुठून येतो. ते नेहमी धोनीच्या भूतकाळात जातात आणि माझ्यासोबतच्या नात्याची चर्चा करतात. धोनीनंतर माझे 3-4 अफेअर होते. परंतु त्याबद्दल कधी चर्चा नाही झाली. मी धोनीला ती पूर्णतः ओळखते. परंतु त्याला प्रेमसंबंध म्हणू की नको?, हा प्रश्न मला नेहमी सतावतो. धोनीचा मी नेहमी सन्मान करते आणि करत राहीन.”
रॉय लक्ष्मी हिने ‘जुली 2’ आणि ‘अकीरा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“सामना संपल्यानंतर तो माझ्यासोबत…,” विराटच्या आयपीएल २०२०मधील स्लेजिंगवर सूर्यकुमारची प्रतिक्रिया
Video: सराव सत्रात विराटने रोहितपुढे केली त्याच्याच शॉटची नक्कल, हिटमॅनने दिली ‘अशी’ रिऍक्शन
विराटच्या भिडूकडून रोहितचं भरभरून कौतुक; म्हणाला, “त्याच्यामुळेच मी आयपीएल खेळू शकलो”