---Advertisement---

विराटच्या भिडूकडून रोहितचं भरभरून कौतुक; म्हणाला, “त्याच्यामुळेच मी आयपीएल खेळू शकलो”

On: मंगळवार, मे 25, 2021 12:07 PM
---Advertisement---

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आयपीएल २०१४ पासून तो आरसीबी संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. त्याच्या योगदानामुळे बऱ्याचदा आरसीबी संघाने अशक्यप्राय सामने जिंकले आहेत. परंतु चहलसाठी कर्णधाराच्या रुपात विराट कोहलीपेक्षा रोहित शर्माचे महत्त्व जास्त आहे. याबाबत स्वत: चहलनेच वक्तव्य केले आहे.

खरे तर, चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात आरसीबी नव्हे तर मुंबई इंडियन्स संघाकडून केली होती. त्याने २०१३ साली रोहितच्या नेतृत्त्वाखाली टी२० चॅम्पियनशीप खेळली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने आयपीएल पदार्पण केले होते. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहितने चहलला त्याच्या खोलीत जाऊन त्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात (टी२० चॅम्पियनसीप सामना) संधी देण्याचे वचन दिले होते.

याबाबत एका मुलाखतीत बोलताना चहल म्हणाला की, “माझे रोहित भैयासोबत विशेष नाते आहे. कारण आम्ही २०११ पासून एकमेकांना ओळखतो. मी रोहित भैयामुळेच आयपीएलमध्ये पाऊल ठेवले होते. मला कोणत्याही सामन्यात संधी मिळत नव्हती. परंतु रोहित भैयाच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे आल्यानंतर त्याने मला संधी दिली. तो माझ्या खोलीत आला होता आणि मला म्हणाला होता की, तू आज खेळणार आहेस. त्याचे बोल ऐकून मी चकित झालो होतो. कारण संघात आधीपासून हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझासारखे गोलंदाज होते. महत्त्वाचे म्हणजे, यापुर्वी आम्ही कधी ३ फिरकीपटूंसह मैदानावर उतरलो नव्हतो.”

रोहितने विश्वास दाखवला, तेव्हापासून आमचे खास नाते बनले
“माझ्यासाठी टी२० चॅम्पियन्सशीप चांगली राहिली होती आणि मी मुंबईच्या सराव सामन्यातही विकेट्स घेत असायचो. परंतु मुंबईची खेळपट्टीही तशीच होती. कारण त्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. यामुळे कोणीही मुंबईच्या मैदानावर ३ फिरकीपटूंसह खेळू शकत नव्हते. भज्जी-ओझा हे आधीपासूनच वर्ल्ड क्लास गोलंदाज होते. तरीही रोहितने मला खेळवण्याचे आश्वासन दिले होते. तिथूनच रोहितसोबत माधे खास बनले होते,” असे त्याने पुढे सांगितले.

रोहितने संधी दिल्यामुळे आला नावारुपाला
दुर्दैवाने २०१३ साली मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केल्यानंतर चहलला पूर्ण हंगाम बाकावर बसून राहावे लागले होते. कारण पदार्पणाच्या सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नव्हता. परंतु रोहितने त्याला संधी दिल्यामुळे तो प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सरजी’ आले! अष्टपैलू रविंद्र जडेजा मुंबईत दाखल, हटके फोटो शेअर करत वेधले लक्ष

“पुर्वी १० पैकी ९ युवक धोनी किंवा कोहलीसारखं बनू इच्छित असे, पण आता..,” दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य

‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---