---Advertisement---

IND vs NZ: हर्षित राणा ठरतोय न्यूझीलंडसाठी डोकेदुखी! एकाच दौऱ्यावर दिग्गज फलंदाजाला 4 वेळा केलं बाद

On: शुक्रवार, जानेवारी 23, 2026 9:58 PM
---Advertisement---

डेव्हॉन कॉनवेने (Devon Convey) रायपूरमध्ये तुफानी सुरुवात केली होती, त्याच्या फलंदाजीकडे पाहून आज तो मोठी खेळी करेल असे वाटत होते. अर्शदीपच्या षटकात कॉनवेने काही सुरेख फटके मारले, तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) चेंडू हर्षित राणाच्या हाती सोपवला.

न्यूझीलंडच्या या भारत दौऱ्यावर हर्षितने कॉनवेला यापूर्वी 3 वेळा बाद केले होते आणि आज पुन्हा एकदा कॉनवे हर्षितचीच शिकार ठरला. विकेट घेतल्यानंतर हर्षितने केलेले खास सेलिब्रेशन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

पहिल्या वनडे सामन्यात (वडोदरा) कॉनवेने 56 धावा केल्या होत्या, पण त्याला हर्षित राणानेच बाद केले.
दुसऱ्या वनडे सामन्यात (राजकोट) येथे हर्षितने कॉनवेला केवळ 16 धावांवर तंबूत धाडले.
तिसऱ्या वनडे (इंदोर) येथे या निर्णायक सामन्यातही हर्षितनेच कॉनवेची विकेट घेतली. अशा प्रकारे तिन्ही वनडे सामन्यांत हर्षितने त्याला बाद करण्याचा पराक्रम केला.

नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात हर्षित खेळला नव्हता, त्या सामन्यात कॉनवेला खातेही उघडता आले नव्हते (त्याला अर्शदीपने बाद केले होते). मात्र, रायपूरमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्याने हर्षितला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले.

रायपूरमध्ये डेव्हॉन कॉनवे आणि टिम सीफर्ट यांनी 3 षटकांत 43 धावांची वेगवान सुरुवात केली होती. चौथ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या हर्षितने कॉनवेला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. या दौऱ्यावर चौथ्यांदा कॉनवेला बाद केल्यामुळे हर्षितने चार बोटे दाखवून अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. या खुणेतून तो सुचवत होता की, त्याने चौथ्यांदा कॉनवेला आपली शिकार बनवले आहे.

भारताने नागपूरमध्ये झालेला पहिला सामना 48 धावांनी जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. बुमराहच्या जागी हर्षित राणा आणि जखमी अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---