गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीची वाट पाहत आहेत. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मुंबईमध्ये एकत्र जमण्यास सुरुवात झाली आहे. इथेच भारतीय खेळाडू १४ दिवस विलगीकरणात राहून सराव करणार आहेत.
अशातच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा सराव सत्रातील मस्ती करत असतानाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत रोहित शर्मा बॅट हातात धरून नेटच्या दिशेने जाताना दिसतो. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेला कर्णधार विराट रोहितच्या पाय उंचावलेल्या शॉटची नक्कल करण्यास सुरवात करतो. हे पाहून रोहित शर्मा हसतो आणि विराटच्या दिशेने जातो. रोहित आणि विराट यांच्यात अंतर्गत वाद असल्याचे म्हटले जात असले तरीही हे दोघे अनेकदा मैदानावर एकत्र मस्ती करताना दिसून आले आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. २ जूनला भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. तत्पूर्वी हे खेळाडू मुंबईत एकत्र जमले आहेत.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1396784841476034560?s=20
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक






