जगातील महान दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या लग्नाला काल (२४ मे) २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ मे १९९५ला सचिनचे डॉक्टर अंजली मेहतासोबत लग्न झाले होते. आता त्यांना अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर अशी दोन मुले आहेत.
सचिन आणि अंजलीची कहाणी सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या पहिल्या भेटीपीसून ते लग्नापर्यंत सर्वच काही चाहत्यांपासून लपून राहिलेले नाही. मात्र, सचिनच्या त्याच्या सासूशी झालेल्या पहिल्या मुलाखतीचा किस्सा खूप कमी जणांना माहिती असणार. तसं तर सचिनची त्याच्या सासूशी झालेली पहिली भेट खूप रोमांचक होती.
एनाबेल मेहता असे सचिनच्या सासूचे नाव आहे. सचिन त्यांना भेटण्यासाठी त्याच्या सासूच्या फ्लॅटवर खाकी रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पॅंट घालून गेला होता. एनाबेल यांनी मुलाखतीत सांगितले होते की, एक कमी उंचीचा कुरळ्या केसाचा मुलगा मला फ्लॅटवर भेटण्यासाठी आला होता.
मैदानावर गोलंदाजांपुढे आपल्या बॅटची हुकुमत चालवणारा सचिन त्याच्या सासूपुढे मात्र खूप लाजिरवाना आणि घाबरलेला दिसत होता. मजेची गोष्ट ही आहे की, त्याच्याकडून आताच दाढी केल्यानंतरचा वास येत होता. साहजिक आहे की, आपल्या पत्नीप्रमाणे आपल्या सासूच्या पहिल्या भेटीसाठीही सचिन तयार होऊन गेला असणार.
सचिन आण अंजली यांची पहिली भेट १९९०ला मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली होती. तेव्हा दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी सचिन इंग्लंड दौऱ्यावरुन परत भारतात आला होता आणि अंजली तिच्या आई एनाबेल मेहता घेण्यासाठी विमानतळावर आली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक
टेस्ट चॅम्पियनशीप: ‘हा’ युवा गोलंदाज ठरेल बुमराहचा सर्वोत्कृष्ट पर्याय, माजी दिग्गजाने सांगितले नाव