वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (darren sammy) याच्या मते भारतीय संघ (team india) सध्या चांगल्या कर्णधाराच्या हातात आहे. त्याच्या मते रोहित शर्मा एमएस धोनीप्रमाणेच खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून घेतो. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात फेब्रुवारी महिन्यात मायदेशात टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्मा या मालिकेतून संघात पुनरागमन करेल. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तो दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. अशातच सॅमीने ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सॅमीच्या मते विराटने संघासाठी चांगले नेतृत्व केले, पण त्याने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाचे कसलेही नुकसान होण्याची शक्यता नाही.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना डॅरेन सॅमी म्हणाला की, “कोहलीने मैदानावर अप्रतिम प्रदर्शन केले आहे. मला नाही वाटत की संघावर याचा काही फरक पडेल. रोहितने मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट नेतृत्व केले आहे. तो एक प्रेरणादायी कर्णधार आहे. मी त्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना पाहिले आहे. तो त्या कर्णधारांपैकी एक आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवले आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर सामील आहेत.”
सॅमीने पुढे बोलताना असेही सांगितले की, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नेहमी संघातील खेळाडूंना सहकार्य केले आहे आणि त्यामुळेच महत्वाच्या स्पर्धांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. सॅमी म्हणाला की, “हे सर्वजन त्यांच्या सोबतच्या खेळाडूंकडून चांगले प्रदर्शन करून घेऊ शकतात. त्यांनी सहसा त्यांच्या सहकाऱ्यांना चांगली कामगिरी करायला लावली आणि ट्रॉफी जिंकल्या आहेत. मला भारतीय क्रिकेटविषयी चिंता नाहीय, ते चांगल्या हातांमध्ये आहे.”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका केवळ दोन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेचे सामने ६, ९ आणि १२ फेब्रुवारीला खेळले जातील. त्यानंतर उभय संघातील टी-२० मालिका कोलकातामध्ये ईडन गार्डंस स्टेडियमवर पार पडेल. टी-२० मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारीला, दुसरा १८ आणि तिसरा २० फेब्रुवारीला खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्येही धोनीच असणार सीएसकेचा कॅप्टन? जडेजाला पाहावी लागणार वाट, वाचा सविस्तर
मी कसा काय पडलो? मैदानावर उलट धावताना धपाक्कन कोसळला अंपायर, स्क्रिनवर सर्वांनीच पाहिलं
व्हिडिओ पाहा –