---Advertisement---

बुढ्ढा होगा तेरा बाप! ४५ वर्षाच्या ‘या’ खेळाडूने पाडला १५ चौकार आणि १५ षटकारांचा पाऊस

On: शनिवार, मे 22, 2021 12:53 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये वारंवार युवा खेळाडूंना संधी देण्याविषयी चर्चा केली जाते. क्रिकेट आता वयस्कर खेळाडू खेळू शकणार नाहीत असेदेखील काहीजण म्हणतात. मात्र, काउंटी चॅम्पियनशिपमधील केंट संघाच्या डॅरेन स्टीवन्स याने या सर्व तर्कांना खोटे पाडले आहे. ४५ वर्षीय डॅरेनने आजही आपण आपल्या संघाचा सर्वात मोठा मॅचविनर असल्याचे सिद्ध केले. ग्लॅमॉर्गनविरुद्ध १९० धावांची खेळी करताना त्याने प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ३६ वे शतक पूर्ण केले.

चौकार-षटकारांचा पडला पाऊस
डॅरेनने १९० धावांची खेळी करताना अवघे १४९ चेंडू खेळले. ज्या खेळपट्टीवर इतर फलंदाज धावांसाठी झगडत होते, त्याच खेळपट्टीवर डॅरेनने प्रत्येकी १५ चौकार व १५ षटकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. विशेष म्हणजे यातील १५० धावा केवळ चौकार-षटकारांच्या साहाय्याने आल्या. ८ बाद १२८ अशा स्थितीतून केंटने या डावामध्ये ३०७ धावांची मजल मारली.

सातव्या क्रमांकावर येत ठोकले शतक
केंट संघामध्ये अनेक युवा आणि प्रतिभावंत खेळाडू आहेत. मात्र, ग्लॅमॉर्गनच्या मायकल नेसर व गुग्टेन यांच्या गोलंदाजीपुढे त्यांनी गुडघे टेकले. नुकताच इंग्लंड संघात निवड झालेला यष्टीरक्षक ओली रॉबिन्सनने ४३ धावांची खेळी केली. कर्णधार सॅम बिलिंग्स ११ तर, झॅक क्राऊली खातेही न खोलता माघारी परतला. त्यानंतर, डॅरेनने सातव्या क्रमांकावर मैदानात येत ही तुफानी खेळी केली.

डॅरेनने केवळ ९२ चेंडूमध्ये ७ षटकारांच्या मदतीने आपले ३६ वे शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याने धावांचा वेग वाढवला. तो द्विशतकाकडे वाटचाल करत असताना मार्नस लॅब्युशेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने नवव्या गड्यासाठी वेगवान गोलंदाज मिग्युएल कमिन्ससह १६६ धावांची भागीदारी केली. कमिन्सने ६१ चेंडूंमध्ये सात धावा केल्या. सध्या डॅरेन काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या खेळणाऱ्या वयस्कर खेळाडूंमध्ये सामील आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत गमावणार? या देशात होऊ शकते आयोजन

इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपल्या ‘या’ कौशल्याला धार देतोय रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ

कमालच! ‘गब्बर’ शिखर धवनचा दिसला अनोखा अंदाज, बासरी वाजवतानाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---