---Advertisement---

केएल राहुलने दिली नाही संधी; आता चार चेंडूत चार बळी घेत केली मलिंगाची बरोबरी

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 7:44 PM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने विदर्भावर चार धावांनी विजय मिळवला. विदर्भ संघाने नाणेफेक जिंकत कर्नाटकला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. कर्नाटकने २० षटकात १७६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करतांना विदर्भ संघ निर्धारित २० षटकात १७२ धावा करू शकला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात विदर्भाच्या वेगवान गोलंदाजाने हॅट्रिक घेत खळबळ माजवली.

स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने २० षटकात १७६ धावा केल्या होत्या. ही धावसंख्या मोठी होऊ शकली असती पण शेवटच्या षटकात विदर्भाच्या वेगवान गोलंदाजाने कहर केला. विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेने उपांत्य फेरीच्या सामन्यात हॅट्रिक घेतली. त्याने चार चेंडूंत चार बळी घेतले.

अंतिम षटकात दर्शन नळकांडेने अनिरुद्ध जोशी, बीआर शरथ यांना बाद केले आणि त्यानंतर जगदीश सुचितची विकेट घेत नळकांडेने आपली हॅट्रिक पूर्ण केली. एवढेच नाही तर चौथ्या चेंडूवर नळकांडेने अभिनव मनोहरचीही विकेट घेतली. दर्शन नळकांडेने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दर्शन नळकांडे हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याला आयपीएल २०२० मध्ये पंजाब किंग्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. नळकांडे केवळ गोलंदाजीच करत नाही तर तो अप्रतिम फलंदाजीही करतो. पण त्याला विदर्भाकडून फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने देखील नळकांडेला आयपीएल २०२१ मध्ये पदार्पण करण्याची संधी दिली नव्हती. परंतु, आता या गोलंदाजाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. नळकांडेने या हंगामात ८ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत. दर्शन नळकांडेचा इकॉनॉमी रेट फक्त ५.८८ प्रति षटक इतका आहे. नळकांडेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ९ धावांत ५ विकेट घेतल्या होत्या, ही त्याची टी२० मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---