---Advertisement---

खांद्याला चेंडू लागल्यावर तेंडूलकरला दिले होते बाद, आज तसं करणारा अंपायर काय म्हणतोय पहा

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे माजी पंच डॅरेल हार्पर यांनी १९९९ मध्ये भारतीय संघाचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला खांद्याला चेंडू लागूनही पायचीत (एलबीडब्ल्यू) दिले होते. त्यामुळे पंच हार्पर यांना भारतात नेहमीच लक्षात ठेवले जाते. परंतु त्यांना या निर्णयावर काहीही खेद नाही. हार्पर यांनी म्हटले, की मी नियमांनुसारच निर्णय दिला होता. तरीही त्यानंतर काही दिवस मला वाईट स्वप्न आले. सचिन आणि ग्लेन मॅकग्रा स्वप्नात येत होते.

ऍडलेड येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला तब्बल २८५ धावांनी पराभूत केले होते. या मालिकेत सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करत होता.

शून्य धाव करून बाद झाला होता सचिन

सचिनने (Sachin Tendulkar) त्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात तो मॅकग्राच्या (Glenn McGrath) चेंडूवर शून्य धावेवर पायचीत झाला होता. मॅकग्राने टाकलेला शॉर्ट चेंडूचा बचाव करण्यासाठी सचिन खाली बसला होता आणि चेंडू त्याच्या खांद्याला लागला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने अपील केली असता, हार्पर (Daryl Harper) यांनी सचिनला बाद घोषित केले होते.

मला या निर्णयाचा अभिमान आहे- हार्पर

“मी त्या ‘तेंडुलकर निर्णया’कडे प्रत्येक दिवशी पाहतो. मी त्यादिवशी झोपलो नव्हतो, मला वाईट स्वप्न येत होते, माझ्या डोक्यात रिप्ले चालू होते, अशातली बाब नव्हती. मला येता- जाता सचिन आणि मॅकग्राची पेंटिंग दिसायची. मी कशाचीही भीती न बाळगता सामन्याच्या नियमांनुसार निर्णय दिला होता. मला या निर्णयाचा अभिमान आहे. कदाचित तुम्हाला हे जाणून वाईट वाटेल,” असे एशियानेट न्यूजएबलशी बोलताना पंच हार्पर यांनी म्हटले.

सचिननेही म्हटले होते, की तो खरोखर बाद झाला होता

“मी डिसेंबर २०१८मध्ये तत्कालीन बीसीसीआय मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांच्याशी २० वर्षांनंतर माझी त्याच सुंदर मैदानात (ऍडलेड) भेट झाली होती. त्यांनी मला सांगितले होते, की सचिनने सामन्यानंतर म्हटले होते, की तो खरोखर बाद झाला होता. तेव्हा प्रसाद यांनीही म्हटले होते, की मलाही वाटले होते की तो बाद आहे,” असे एमएसके प्रसाद यांच्याबद्दल बोलताना हार्पर म्हणाले. विशेष म्हणजे १९९९ च्या त्या कसोटी सामन्यात प्रसाद हे यष्टीरक्षक होते आणि आपला ४ था कसोटी सामना खेळत होते.

https://www.youtube.com/watch?v=47jhkGWbt5E&feature=emb_logo

सचिनने भारतीय संघाकडून २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने आणि एकमात्र आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने कसोटीत १५९२१ धावा, वनडेत १८४२६ धावा आणि टी२०त केवळ १० धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-ऑस्ट्रेलियाला जाणारी टीम इंडिया इतिहासात पहिल्यांदाच जाणार मोदींच्या गुजरात मार्गे

-या ३ भारतीयांना वेळीच संधी मिळाली असती तर आज असते दिग्गज क्रिकेटपटू

-काय सांगता! ६ महिन्यात होणार २ आयपीएल स्पर्धा, पण कशा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---