चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे. धोनी शांत स्वभावासाठी आणि उत्कृष्ट रणनीतीसाठी ओळखला जातो. पण धोनीचे नाव अनेकदा वादात सापडले आहे. खरे तर, आयपीएल 2023 मध्ये गुजरातविरूद्धच्या सामन्यादरम्यान अंपायर डॅरिल हार्परने एमएस धोनीवर जाणूनबुजून वेळ वाया घालवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी धोनी चेन्नईचा (CSK) कर्णधार होता.
आयपीएल 2023च्या हंगामात क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि अंपायर डॅरिल हार्पर यांच्यात वाद निर्माण झाला होता.
गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ धावांचा पाठलाग करत होता. दरम्यान सीएसकेसाठी मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) डावातील 16वे षटक टाकण्यासाठी आला होता, पण त्यापूर्वी त्याने बराच वेळ घालवला. त्यानंतर अंपायर डॅरिल हार्परने नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, “हे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे. त्यावेळी धोनीकडे अनेक पर्याय होते, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काही लोक नियमांच्या वर आहेत, असे होऊ नये, हे खेळाच्या भावनेच्या विरोधात आहे.”
धोनी आता सीएसकेचा कर्णधार नाही. युवा खेळाडू रूतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद उंचावले आहे. धोनीच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 264 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 39.13च्या सरासरीने 5,243 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 137.54 राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 24 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 84 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! कसोटीमध्ये ‘या’ फलंदाजांनी झळकावली सर्वाधिक त्रिशतके
मोहम्मद शमीचा टीम इंडियात कमबॅक कधी? स्वत: दिलं मोठं अपडेट
बांगलादेशच्या गोलंदाजांची आता खैर नाही! कडक सिक्स मारत विराटने सराव सत्रादरम्यान तोडली भिंत