लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या. न्यूझीलंडने आता इंग्लंडवर २२७ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल नाबाद राहिले. डॅरिल मिशेल १८८ चेंडूत ९७ आणि टॉम ब्लंडेल १८२ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या आहेत. एका वेळी न्यूझीलंडची स्थिती ४ बाद ५६ अशी झाली होती, पण त्यानंतर डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनी पाचव्या विकेटसाठी १८० धावांची नाबाद भागीदारी खेळून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. मिशेल आणि ब्लंडेलच्या या भागिदीरीने आता दोन विक्रमांची बरोबरी केली आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान पाचव्या विकेटसाठी हा संयुक्त सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे. यापूर्वी १९९४ मध्ये मार्टिन क्रो आणि शेन थॉमसन यांनीही पाचव्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी करून आश्चर्यकारक कामगिरी केली होती. म्हणजेच कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेरीस दोन्ही फलंदाज हा विक्रम मोडण्यापासून फक्त एक धाव दूर आहेत.
याशिवाय मिशेल आणि ब्लंडेल यांनी आणखी एक करिष्मा केला आहे. वास्तविक मिशेल ९७ धावांवर नाबाद आहे, तर ब्लंडेल ९० धावांवर नाबाद आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ३९ वर्षांनंतर असे घडले आहे, जेव्हा दिवसाचा खेळ संपल्यानंतर नव्वदीत दोन फलंदाज नाबाद राहिल आहे. शेवटच्या वेळी असे घडले होते, १९८३ साली. जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील हैदराबाद कसोटीत मुदस्सर नजर (९२ धावा) आणि जावेद मियांदाद (९६ धावा) पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी नाबाद होते. त्याआधी १९७४ मध्येही असेच घडले होते, जेव्हा दिवसाचा खेळ संपल्यावर दोन फलंदाज नव्वदीत नाबाद परतले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिवसाच्या खेळानंतर इंग्लंडचे बॉयकॉट ९१ आणि डीएल एमिस ९२ धावांवर नाबाद होते.
Two batters not out in the 90s overnight in a Test:
Eng v WI Port-of-Spain 1974 (Day 3)
G Boycott 91*/DL Amiss 92*Pak v Ind Hyderabad 1983 (Day 1)
Mudassar Nazar 92*/Javed Miandad 96*NZ v Eng Lord's 2022 (Day 2)
DJ Mitchell 97*/TA Blundell 90*— Andrew Samson (@AWSStats) June 3, 2022
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या या कसोटीच्या पहिल्या डावांत न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा मात्र १३२ धावांत त्यांचा डाव आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला देखील विशेष कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला देखील पहिल्या डावांत केवळ १४१ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडला ९ धावांची बढत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावांत फलंदाजी करत असताना सध्या न्यूझीलंडने ४ बळी गमावत २३६ धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या न्यूझीलंडकडे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस २२७ धावांची आघाडी आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अगग! २२ वर्षीय गोलंदाजाच्या रणनितीपुढे अनुभवी विलियम्सनने टेकले गुडघे, स्टोक्सलाही हसू अनावर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचे ठरले ठिकाण! पाहा कोणत्या मैदानावर रंगणार अंतिम सामना