वनडे विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला जात आहे. यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने देखील झुंज दिली. संघाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज डेरिल मिचेल याने जबाबदारी घेत शानदार शतक झळकावले.
(Daryl Mitchell Hits Century Against India In ODI World Cup Semi Final)