येत्या काही दिवसांत भारताच्या बहुप्रतिक्षित श्रीलंका दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. कोविड-१९ महामारीमुळे १३ जुलैपासून वनडे सामन्याने सुरू होणारा हा दौरा १७ जुलैपासून खेळला जाणार आहे. तर २७ जुलै रोजी २० सामन्याने या दौऱ्याचा अंत होणार आहे. वेळापत्रकातील बदलानुसार यजमानांच्या संघातही काही बदल पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. जुना कर्णधार कुशल परेरा याच्याजागी दसुन शनाका श्रीलंकेच्या वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.
मागील काही वर्षांत श्रीलंका संघाने दर दुसऱ्या मालिकेत संघनायक बदलला असल्याचे दिसत आहे. विशेषत: वनडे संघाच्या कर्णधारामध्ये बदल होण्याची संख्या तर १० पर्यंत पोहोचली आहे. मागील ४ वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून श्रीलंकाने वनडेत १० कर्णधार बदलले आहेत.
आगामी ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताविरुद्ध श्रीलंका संघाची कमान सांभाळणारा शनाका २०१७ नंतरचा दहावा कर्णधार असणार आहे. तसे तर, श्रीलंकाने इतके संघनायक बदलण्यामागचे मुख्य कारण त्यांची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. कारण मागील ९ कर्णधारांनी एकूण ७९ वनडे सामन्यांमध्ये श्रीलंका संघाचे नेतृत्त्व केले आहे. ज्यातील केवळ २२ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तर तब्बल ५४ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
२०१७ मध्ये थरंगा श्रीलंकाच्या वनडे संघाचा कर्णधार होता. त्याने या कालावधीत १७ वनडे सामने खेळताना केवळ १ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. तर १५ सामन्यात पराभवाचे तोंड दाखवले. उर्वरित १ सामने अनिर्णीत राहिले. २०१७ मध्ये थरंगाकडून नेतृत्त्वपद काढून घेतल्यानंतर चमारा कपुगेदराला त्याचवर्षी नवा कर्णधार नियुक्त करण्यात आले होते. मात्र आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने पहिलावहिला सामनाच गमावल्याने त्याचीही हकालपट्टी करण्यात आली.
त्यानंतर २०१७ मध्ये अनुभवी एंजिलो मॅथ्यूजला पुन्हा वनडेचा संघनायक बनवण्यात आले. त्याने २०१८ पर्यंत ही जबाबदारी पार पाडत १५ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय तर १० सामन्यात पराजय नोंदवला. अव्वल वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडेही बोर्डाने ही जबाबदारी सोपवून पाहिली. त्याने २०१७-१९ या काळात ९ वनडेत संघाचे नेतृत्त्व केले आणि सर्व ९ सामने गमावले.
याशिवाय थिसारा परेरा (३ सामने-१ विजय २ पराजय, २०१७), दिनेश चंडीमल (९ सामने-४ विजय ४ पराजय, २०१८) हेदेखील श्रीलंकेच्या वनडे संघाच्या कर्णधारपदी होते. त्यानंतर २०१९ ते २०२१ या काळात तब्बल ३ कर्णधारांची अदलाबदली करण्यात आली, यात दिमुथ करुणारत्ने, लहिरु थिरीमाने आणि कुशल परेरा यांचा समावेश आहे. करुणारत्नेने सर्वाधिक १७ सामन्यात नेतृत्त्व करताना संघाला १० विजय आणि ७ पराजय मिळवून दिले. तर थिरीमानेच्या नेतृत्त्वाखाली संघाने २ पैकी दोन्ही वनडे सामने गमावले.
List of Sri Lanka's ODI Captains since 2016:
Angelo Mathews, Dinesh Chandimal, Lahiru Thirimanne ,Upul Tharanga, Chamara Kapugedera, Lasith Malinga, Thisara Perera, Dimuth Karunaratne, Kusal Perera and now Dasun Shanaka #SLvIND
— CricFit (@CricFit) July 9, 2021
२०२१ मध्ये कुशल परेराने संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळताना अतिशय निराशाजनक कामगिरी केली. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ ६ पैकी फक्त १ सामना जिंकू शकला. त्यामुळे त्याचीही सुट्टी करत आता दसुन शनाकाला नवा कर्णधार नियुक्त करण्यात येणार आहे. अशात तो तरी संघाच्या अपेक्षांवर खरा उतरेल की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बरोबरीची टक्कर! भारताविरुद्ध उतरणार श्रीलंकेचा ‘नवा संघ’, इंग्लंडवरुन परतलेले खेळाडू संघाबाहेर?
चूक भोवली! फलंदाजाने ‘ब्रेक डान्स’ करताच गोलंदाज अंगावर गेला धावून, आयसीसीने ठोठावला दंड
परवाच ‘या’ क्रिकेटरने केली १५० धावांची विक्रमी खेळी, आता अचानकच निवृत्ती घेत दिला धक्का