---Advertisement---

धडाकेबाज दसून! भारतीय गोलंदाजी फोडत शनाकाने ठोकले ‘रेकॉर्डब्रेक’ अर्धशतक

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 9:32 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक रूप दाखवत या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. कर्णधार दसून शनाकाने वादळी अर्धशतक करत पाहुण्या संघाला 200 पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

श्रीलंका संघासाठी या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य होते. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर कुसल मेंडीस आणि पथुम निसंका यांनी 8.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत श्रीलंकेला नियमित अंतराने धक्के दिले. मात्र, संघ अडचणीत असताना कर्णधार दसून शनाका याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

https://twitter.com/ICC/status/1611018028992413700?t=nnE0O0DlMVWkTn7sPuz_uQ&s=19

 

उमरान मलिक याला एकाच षटकात तीन षटकार त्याने लगावले. त्यानंतर शिवम मावी व अर्शदीप सिंग यांचा देखील त्याने खरपूस समाचार घेतला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 22 चेंडूवर 56 धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार व सहा उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 20 चेंडू घेतले. भारताविरुद्ध 250 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज बनला.

यापूर्वी श्रीलंकेकडून सर्वात वेगवान टी20 अर्धशतकाचा विक्रम माहेला जयवर्धने व कुमार संगकारा यांच्या नावे संयुक्तरीत्या होता. दोघांनीही 21 चेंडूंमध्ये अर्धशतके पूर्ण केलेली. तर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी 22 चेंडूवर अर्धशतक पूर्ण करणारा कुसल परेरा आहे.

(Dasun Shanaka Hits Fastest T20I Fifty For Srilanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…” 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---