गुजरातचा स्टार खेळाडू केन विलियम्सन आयपीएल 2023मधून बाहेर पडला आहे. विलियम्सनचे हंगामातून बाहेर होणे, गुजरातसाठी धक्का मानला जातोय. त्याचवेळी आता गुजरातच्या संघाने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली. विलियम्सनच्या जागी श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका गुजरातचे प्रतिनिधित्व करेल.
Dasun Shanka replaces Kane Williamson in IPL 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) April 4, 2023
केन विलियम्सन संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून कोण येणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. त्यानंतर तीन दिवसानंतर त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली गेली. ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड हा त्याच्या जागी बदली खेळाडू येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अखेर शनाकाला संधी मिळाली.
शनाका याने मागील दोन दौऱ्यावर भारतात शानदार अष्टपैलू कामगिरी करून दाखवली आहे. त्याने भारतीय मैदानांवर टी20 मध्ये 6 सामने खेळताना 150 च्या स्ट्राईक रेटने तीन अर्धशतकांसह धावा कुटल्या आहेत. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने संघाला त्याचा देखील फायदा होऊ शकतो. शनाकाने आत्तापर्यंत एकदाही आयपीएल खेळलेली नाही. त्यामुळे या हंगामात तो आपले पदार्पण देखील करू शकतो.
आयपीएल 2023 मधून विलियम्सन बाहेर
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केन विलियम्सन (Kane Williamson) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्पर्धेबाहेर झाल्यानंतर विलियम्सन आता घरी पोहोचला आहे. तिथून तो वॉकरच्या साहाय्याने चालतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(Dasun Shanaka Replace Kane Williamson In IPL 2023 For Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING । लवकरच श्रेयस अय्यरची मोठी शस्त्रक्रिया, आयपीएलसह महत्वाच्या सामन्यालाही मुकणार
आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज