श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. दसुन शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंका संघ गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेच्या सुरुवातीला लखनऊ येथे मैदानात उतरेल. नजीकच्या काळात श्रीलंका संघाचे प्रदर्शन इतके प्रभावी राहिले नाही. मात्र, कर्णधार शनाकाने या दौऱ्यावर चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणाला शनाका?
टी२० मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शनाका म्हणाला,
“आमच्या फलंदाजांसमोर भारताच्या एका सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणाचे आव्हान असेल. आम्ही आमच्या वरच्या फळीतील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहोत. आम्हाला आमच्या गोलंदाजांना बचाव करण्यासाठी एक मोठी धावसंख्या उभारून द्यायला हवी. आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी तत्पर आहोत.”
प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर
श्रीलंका संघाला नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. भारतात येताच संघासाठी सर्व परिस्थिती बिघडली आहे. कारण, संघाचा प्रमुख लेगस्पिनर वनिंदू हसरंगा हा दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झाला आहे. तसेच, अनुभवी फलंदाज कुशल मेंडिस व युवा फिरकीपटू महिश थिक्षना हे दुखापतग्रस्त झाल्याने निवडीसाठी उपलब्ध नसतील.
अशी राहिली आहे आतापर्यंतची कामगिरी
भारत आणि श्रीलंका हे संघ आतापर्यंत २२ वेळा टी२० मध्ये समोरासमोर आले आहेत. त्यापैकी १४ सामन्यात भारत तर ७ सामन्यात श्रीलंका संघ विजयी झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या टी२० मालिकेत श्रीलंकेने भारताला २-१ असा विजय मिळवला होता.
टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघ-
पथुम निसंका, कुसल मेंडिस, दसुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणाथिलिका, जनिथ लियांगे, चरिथ असलंका, वानिंदु हसरंगा, दिनेश चंडीमल, कामिल मिशारा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथ चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरान फर्नांडो, महीश थिक्षणा, जैफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, अशियन डेनियल.
महत्वाच्या बातम्या-






