2019 विश्वचषक जूलैमध्ये संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच ऑगस्टमध्ये विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक विंडीज क्रिकेट बोर्डाने घोषित केले आहे. 5 आठवड्यांचा असणाऱ्या या दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून 3 सप्टेंबरला या दौऱ्याचा शेवट होईल.
या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका होतील. भारताच्या या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होईल. या मालिकेतील पहिला आणि दुसरा टी20 सामना अनुक्रमे 3 आणि 4 ऑगस्ट, असे सलग दोन दिवस उत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे.
त्यानंतर तिसरा टी20 सामना 6 ऑगस्टला गयाना येथे पार पडेल. तसेच गयाना येथेच 8 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील दुसरा आणि तिसरा वनडे सामना त्रिनिदादला अनुक्रमे 11 आणि 14 ऑगस्टला पार पडले.
टी20 आणि वनडे मालिकानंतर विंडीज आणि भारत संघात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. तसेच या मालिकेनेच टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान अँटीग्वाला होणार आहे. तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरला जमैकाला होणार आहे.
टेस्ट चॅम्पियनशिप ही आयसीसीची स्पर्धा असून पुढील 2 वर्षे 12 कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या संघांपैकी 9 संघात ही स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये प्रत्येक संघाला 8 प्रतिस्पर्धी संघांपैकी सहा संघांशी कसोटी मालिका खेळायची आहे.
त्यानंतर दोन वर्षांनी जून 2021 ला इंग्लंडमध्ये अव्वल दोन संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी एकमेकांचा सामना करतील. या स्पर्धेत कसोटी क्रिकेटचा दर्जा असणारे अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे तीन संघ सहभागी होणार नाहीत.
असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 –
टी20 मालिका –
3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा
4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा
6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना
वनडे मालिका –
8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना
11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद
14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद
कसोटी मालिका –
22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरा कसोटी – जमैका
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड विरुद्ध अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया
–डेव्हिड वॉर्नरने चक्क सामनावीर पुरस्कार दिला या लहान चाहत्याला, पहा व्हिडिओ
–किंग कोहलीला आज मास्टर ब्लास्टरला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी