---Advertisement---

‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, येत्या टी२० विश्वचषकासाठी टीम ठरू शकली नाही पात्र

On: रविवार, ऑगस्ट 29, 2021 3:44 PM
---Advertisement---

नेपाळ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नेपाळ क्रिकेट असोसिएशनला याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार असल्याचे नेपाळ क्रिकेट मंडळाला सांगितले आहे. ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-2 चा सामना हा त्यांचा संघासोबतचा शेवटचा सामना असेल. कोविड-19 मुळे व्हॉटमोर यांनी हा निर्णय घेतला असू शकतो. कारण ते बऱ्याच दिवसांपासून आपल्या कुटुंबाला भेटू शकलेले नाहीत.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ते नेपाळ संघाचे प्रशिक्षक झाले होते आणि 2021 च्या सुरुवातीला त्यांनी पदभार स्वीकारला होता. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघाला पात्र बनवण्याकडे त्यांचा भर होता. किंतु नेपाळ संघ 2021च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र होऊ शकलेला नाही. व्हॉटमोर यांच्याआधी नेपाळ संघाचे प्रशिक्षक उमेश पटवाल होते. उमेश यांनी राजीनामा दिल्यानंतर 10 महिन्यांनी व्हॉटमोर यांनी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता.

व्हॉटमोर यांची गणना क्रिकेट जगतातील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये केली जाते. त्यांच्या काळातच श्रीलंकेने 1996 मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर ते बांगलादेशचे प्रशिक्षक झाले. 2003 ते 2007 पर्यंत ते बांगलादेशसोबत राहिले आणि या काळात या संघाने जागतिक क्रिकेट मंचावर एक नवीन रूप दाखवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने मोठी सुधारणा केली आणि जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःला प्रस्थापित केले होते. 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी बांगलादेशला सुपर-8 मध्ये नेले होते. या विश्वचषकात बांगलादेशमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकासारखे संघ बाहेर फेकले गेले होते.

व्हॉटमोरने भारतातही काम केले आहे. ते भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय त्यांनी आयपीएल फ्रेंचाइजी कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ते केकेआरसोबत दोन हंगामात प्रशिक्षक म्हणून राहिले आहेत. याशिवाय त्यांनी केरळ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी 2018-19 मध्ये संघाला रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. केरळ त्यावेळी प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडच्या अडचणीत वाढ! ‘हा’ प्रमुख खेळाडू उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घेण्याची शक्यता

संधी असूनही फलंदाजाला दिले जीवनदान अन् मारली मिठी, ब्रावोच्या खेळाडूवृत्तीने जिंकली लाखो मने

भारताच्या हारकिरीस कमजोर फलंदाजी जबाबदार, दिग्गजाने चौथ्या कसोटीसाठी सुचवला ‘या’ धुरंधराचा पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---