काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2022) एका खेळाडूची खूप चर्चा झाली. दक्षिण अफ्रिकेच्या युवा संघाचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस (Dewald Bravis) याने १९ वर्षाखालील विश्वचषकात अप्रतिम फलंदाजी केली आणि स्वतःची ओळख निर्माण केली. याच पार्श्वभूमीवर आयपीएल मेगा लिलावात (IPL mega auction) त्याला मोठी रक्कम मिळाली. परंतु विश्वचषक स्पर्धेनंतर ब्रेविस अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाहीय.
डेवाल्ड ब्रेविस दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्ससारखी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत ब्रेविसने खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये एकूण ५०६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या २ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. पण सध्या खेळल्या जात असलेल्या दक्षिण अफ्रिकेतील देशांतर्गत स्पर्धा सीएसए टी२० चॅलेंज मध्ये ब्रेविसने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. या स्पर्धेत तो टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. मंगळवारी (२२ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या नॉर्थ वेस्ट विरुद्धच्या सामन्यात, त्याला एकही धाव करता आली नाही. ड्वेन प्रियोरियसने त्याचा शुन्य धावांवर त्रिफळाचित केले.
दरम्यान, सीएसए टी२० चॅलेंजमध्ये ब्रेविसने केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच साधारण राहिले आहे. स्पर्धेत त्याने खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये २५.५० च्या सरासरीने फक्त १०२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आले नाही.
एबी डिविलियर्सने स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी जेवढा महत्वाचा होता, तेवढाच आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठीही. डेवाल्ड ब्रेविस देखील डिविलियर्सप्रमाणेच फलंदाजी करतो. याच कारणास्तव आयपीएल मेगा लिलावात त्याला मोठी रक्कम मिळाली. मुंबई इंडियन्सने त्याला संघात सामील करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च केले. देशांतर्गत लीगमध्ये ब्रेविसचे खालावलेले प्रदर्शन पाहून मुंबई इंडियन्सची चिंता नक्कीच वाढली असेल.
१९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. अशात भारतीय युवा संघातील खेळाडूंना आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता होती. परंतु डेवाल्ड ब्रेविस भारताच्या युवा संघातील सर्व खेळाडूंवर भारी पडला आहे. तो मेगा लिलावात १९ वर्षाखालील संघांमधली सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अशात पुढच्या आयपीएल हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचेल लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या –
ऑरेंज कॅप विजेताच म्हणतोय, “आयपीएलमध्ये लिलाव नसावा”
अव्वल स्थान राखण्यासाठी हैदराबादसमोर केरलाचे आव्हान
कौतुकास्पद! अवघ्या २१ वर्षीय भारतीयाला सनरायझर्स हैदराबाद बनवणार उपकर्णधार?