बीग बॅश लीगमधील मेलबर्न स्टार्स संघाचा प्रशिक्षक डेव्हिड हसीला 2000 ऑस्ट्रेलियन डॉलर दंड झाला आहे. त्याने मेलबर्न स्टार्स विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या तपासणी दरम्यान स्पाईक्स(शुज) घालून स्पर्धात्मक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणत विनोद केला होता. त्यामुळे त्याला हा दंड ठोठवण्यात आला आहे.
सामन्याच्या नवव्या षटकात हसीने विनोद केला की त्याने सामन्यापूर्वी खेळपट्टीची स्पाईक्स(शुज) घालून तपासणी केली होती. नियमानुसार केवळ कर्णधार आणि प्रशिक्षकाला सामन्यापूर्वी खेळपट्टीची तपासणी करण्याची परवानगी असते. परंतु तपासणी करताना स्पाईक्स(शुज) घालण्याची परवानगी नसते.
हसीने वास्तवात जरी सामन्यापूर्वी स्पाईक्स घातले नसले तरी त्याने केलेले वादग्रस्त भाष्य खिलाडूवृत्तीच्या विरोधी होती. त्यामुळे कलम 2.23 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई हसीने मान्य केली आहे.
या कलमाअंतर्गत खिलाडूवृत्तीच्या विरोधी कृती, एकाद्या अधिकाऱ्याकडून किंवा प्रतिनिधीकडून करण्यात आलेले चूकीचे वर्तन, क्रिकेटच्या हितासाठी हानिकारक गोष्टी करणे, क्रिकेटची बदनामी होईल असे कृती करणे, या गोष्टी येतात.
हसीने ही कारवाई झाल्यानंतर माफी मागितली आहे. तो म्हणाला, “बुधवारी स्ट्रायकर्सविरुद्धच्या आमच्या सामन्यात मी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. मी दिलेली प्रतिक्रिया मस्करीमध्ये होती. खेळाच्या नियमांचे मी कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले आहे असे सुचवण्याचा माझा हेतू नव्हता. मला समजले आहे की माझ्या भाष्यामुळे प्रसारकांना, चाहत्यांना खिलाडूवृत्तीची कमी असल्याचे वाटले असेल. त्यामुळे मी माफी मागतो.’
भारत-न्यूझीलंडच्या या ५ खेळाडूंनी मिळून टी२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास
वाचा👉https://t.co/l2gtqaMwva👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
एकाच दिवसात टीम इंडियाला पाहावा लागला एकाच संघाविरुद्ध विजय आणि पराभव
वाचा- 👉https://t.co/L81Jjj9MiJ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020