---Advertisement---

“कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण”

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 5:52 PM
---Advertisement---

भारतात सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला असून अतिशय वेगाने देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे आयपीएलच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतकेच नाही तर अनेक परदेशी खेळाडूंनी कोरोनाच्या भितीमुळे माघार देखील घ्यायला सुरुवात केली आहे. यात विशेषकरून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा समावेश आहे.

याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्सचा विद्यमान सहाय्यक प्रशिक्षक डेव्हिड हसीने महत्वाचे विधान केले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा बायो बबल मध्ये खेळवली जात आहे. या बायो बबलचा आणि कोरोनाच्या भीतीचा निश्चितच खेळाडूंवर परिणाम होत असल्याचे मत हसीने व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण
यंदाच्या आयपीएल हंगामातून आत्तापर्यंत ७ खेळाडूंनी माघार घेतली आहे. यात ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचा अँड्रयू टाय आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या केन रिचर्डसन आणि अॅडम झाम्पाने माघार घेतली आहे. यापैकी टायने भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मायदेशात प्रवेश बंदी केली जाईल या भीतीने माघार घेतली. तर रिचर्डसन आणि झाम्पाने वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे.

याबाबत ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ या वृत्तपत्राशी बोलतांना डेव्हिड हसी म्हणाला, “आयपीएलचे आयोजन बायो बबलमध्ये करण्यात आले आहे. मात्र भारतातील वाढती रूग्णसंख्या बघता खेळाडूंना भीती वाटणे, साहाजिक आहे. आमची दर एक दिवसाआड कोरोना चाचणी केल्या जात आहे. तसेच आमच्या सुरक्षेसाठी संपूर्ण खबरदारी घेतली जाते आहे. मात्र प्रत्येक क्षणी येणार्‍या बातम्यांनी चिंतेत वाढ होते आहे.”

सगळ्यांसाठीच ही परिस्थिती कठीण असल्याचे सांगत तो पुढे म्हणाला, “सगळेच ही परिस्थिती पाहून निराश झाले आहेत. काही खेळाडूंनी आपल्या आप्तस्वकीयांना यात गमावले आहे. सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांची देखील तीच स्थिती आहे. मात्र जर केकेआरच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचारणार असाल तर आयपीएल सुरु राहावे, अशीच आमची इच्छा असेल. कारण लॉकडाऊन मध्ये दुसरे काही करण्यासारखे देखील नाही आहे.”

महत्वाच्या बातम्या:

कौतुकास्पद! एकीकडे परदेशी खेळाडू माघार घेत असताना पॅट कमिन्स आला भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

बल्ले बल्ले! ख्रिस गेलचा पंजाबी स्वॅग, संघ सहकाऱ्यांसोबत केला भांगडा; एकदा पाहाच

मोठ्या मनाचा माणूस! कोरोना संकटात पुणेकरांच्या मदतीला धावला हरभजन सिंग, केली ही मोलाची मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---