कोलकाता। गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये कुलदीप यादवच्या कामगिरीने कोलकाता नाईट रायडर्सला निराश केले होते. परंतु असे असले तरी संघाचे मुख्य मार्गदर्शक डेव्हिड हसी यांना वाटते की या हंगामात हा भारतीय फिरकीपटू त्याच्या खेळात अव्वल स्थानी आहे आणि तो अजून चांगले प्रदर्शन करत राहील.
या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने 2019 मध्ये 9 सामन्यांत फक्त 4 बळी मिळवले होते. त्यानंतर त्याला खेळण्याची संधी दिली नव्हती.
हसी यांनी पीटीआयला सांगितले की, “युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी 13 व्या हंगामात कुलदीपला आत्मविश्वासात कोणतीही अडचण होणार नाही.”
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने सांगितले की, “गेल्या आठ-नऊ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर तो आपल्या खेळात अव्वल स्थानावर आहे यावर माझा वैयक्तिकरीत्या विश्वास आहे. तो चांगले क्षेत्ररक्षण करत आहे, तो चांगला धावत आहे. तो चांगल्या लयीत गोलंदाजी करीत आहे आणि चेंडू बराच फिरवत आहे.”
कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाला होता की, खराब कामगिरीमुळे कुलदीपला संघातून काढून टाकण्यात आले होते. संघाने त्याला विश्रांती द्यायला हवी होती. जेणेकरून तो नव्याने परत येईल.
कुलदीपच्या क्षमतेबद्दल बोलतांना हसी म्हणाले, “त्याला खूप आत्मविश्वास आहे. तो चेंडूंबरोबर काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे त्याला माहित आहे. तो दोन्ही प्रकारे चेंडू फिरवितो. तो खेळाचा चांगला अभ्यास करतो.”
पुढे बोलतांना ते म्हणाले, “संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याला कोणत्याही आत्मविश्वासाचा त्रास होईल असे मला वाटत नाही. मला वाटते की तो केकेआरचा सातत्यपूर्ण गोलंदाज असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
-राजस्थान रॉयल्सची चिंता वाढली; हा स्टार खेळाडू झालाय दुखापतग्रस्त
-चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या जागी इंग्लंडच्या डेव्हिड मलानला संघात स्थान देण्यास दिला नकार, कारण…
-माजी क्रिकेटरने सांगितले आयपीएल २०२०च्या विजेत्या संघाचे नाव, पहा रोहित-धोनी का तिसरचं…
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?