बंगळूरु। आज(22 सप्टेंबर) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
या विजयाबरोबर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलरसाठीही हा सामना खास ठरला. त्याने या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा झेल घेत एका खास विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
मिलरचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील क्षेत्ररक्षक म्हणून 50 वा झेल होता. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या शोएब मलिकच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मलिकनेही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 झेल घेतले आहेत.
आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या होत्या. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 19 धावा आणि हार्दिक पंड्याने 14 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त भारताकडून एकालाही या सामन्यात दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच बीजॉर्न फॉर्च्यून आणि ब्यूरान हेन्ड्रिक्सने प्रत्येकी 2 विकेट्स तर ताब्राईज शम्सीने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 16.5 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटॉन डीकॉकने नाबाद 79 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रिझा हेन्ड्रिक्सने 28 आणि तेंबा बाउमाने नाबाद 27 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताकडून हार्दिक पंड्याने एकमेव विकेट घेतली.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) –
50 – डेव्हिड मिलर (71 सामने)
50 – शोएब मलिक (111 सामने)
44 – एबी डिविलियर्स (52 सामने)
44 – रॉस टेलर (90 सामने)
42 – सुरेश रैना (78 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–गौतम गंभीर म्हणतो ‘या’ दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करा
–सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या रिषभ पंतला या माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
–जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक