जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या राहुल आवारेने रविवारी भारताला पाचवे पदक मिळवून दिले आहे. त्याने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ली ग्राफला 11-4 अशा फरकाने पराभूत केले.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील हे भारताचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. याआधी 2013मध्ये या स्पर्धेत भारताने 3 पदके मिळवली होती. पण यावर्षी राहुलबरोबरच दीपक पुनिया, विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि रवि कुमार दहिया यांनी पदके मिळवली आहेत. यातील दीपकने रौप्य पदक तर अन्य चार जणांनी कांस्य पदक मिळवले आहे.

राहुलने याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. मात्र राहुलने रविवारी मिळवलेल्या यशानंतरही त्याला 2020 टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळालेला नाही. कारण 61 किलो वजनी गटाचा कोटा या ऑलिम्पिकमध्ये सामील नाही.

रविवारी राहुलच्या आधी दीपक पुनियाला अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या रिषभ पंतला या माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला पाठिंबा

विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र

You might also like

Leave A Reply