दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी20 (SA20) लीगमध्ये आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने संघ विकत घेतला आहे. पार्ल रॉयल्स या नावाने हा संघ स्पर्धेत सहभागी होईल. रविवारी (18 सप्टेंबर) पार्ल रॉयल्स संघाने आपल्या ट्विटर हँडलवरून या पहिल्या हंगामासाठी आपल्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरची SA20 च्या पहिल्या आवृत्तीसाठी संघाचे नेतृत्व करेल. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
hey (with the intention of being your captain) ✌🏻#RoyalsFamily pic.twitter.com/XuPos1Xv41
— Paarl Royals (@paarlroyals) September 18, 2022
डेव्हिड मिलर याने आयपीएल 2022 मध्ये शानदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मिलरने यावर्षी 16 सामन्यात 142.73 च्या स्ट्राइक रेटने 481 धावा चोपलेल्या. त्याच्याच नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला होता.
मिलर सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) च्या सुरू असलेल्या हंगामात बार्बाडोस रॉयल्स संघाचे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वात संघाने सात पैकी सहा सामने जिंकलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अनुभवी फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकही त्यानेच ठोकले होते.
कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बोलताना मिलर म्हणाला, “पार्ल रॉयल्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. पार्ल आणि एकूणच वेस्टर्न केपचे लोक दर्जेदार आणि मनोरंजनक क्रिकेटचे समर्थक आहेत. हा एक नवा प्रवास सुरू करण्यात साठी मी आतुर आहे.”
पार्ल रॉयल्सने लिलावापूर्वी आपल्या संघात चार खेळाडूंना ड्राफ्ट केले आहे. डेव्हिड मिलरसह सध्या इंग्लंडचा कर्णधार असलेला जोस बटलर, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉय व दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू कॉर्बिन बॉश यांचा समावेश आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज जेपी डुमिनी जबाबदारी सांभाळेल. स्पर्धेसाठी 19 सप्टेंबर रोजी लिलाव पार पडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हणून शमीच्या जागी संघात झाली उमेशची एंट्री, कॅप्टन रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण
इंडिया ए ची न्यूझीलंड ए वर सरशी! दणदणीत विजयासह मालिकाही घातली खिशात
“त्याने स्वतःला सिद्ध केलंय”, या खेळाडूच्या कामगिरीने रोहित झालाय भलताच खुश