भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 237 धावा उभारलेल्या. याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. मात्र, तरीही भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने सामना गमावला तरीही, दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरने नाबाद शतक झळकावत सर्वांची मने जिंकली.
A brilliant hundred from Miller ????????#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/hMlJxs4OjI
— ICC (@ICC) October 2, 2022
भारतीय संघाने 238 धावांचे आव्हान दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. 50 धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक व डेव्हिड मिलर यांनी अखेरपर्यंत विजयासाठी शर्थीच प्रयत्न केले. दोघांनी 174 धावांची नाबाद भागीदारी केली. परंतु, ते संघाला विजयी रेषेपार नेऊ शकले नाहीत.
डेव्हिड मिलरने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 47 चेंडूत 8 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा चोपल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 225 इतका जबरदस्त होता. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले.
या खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पाचव्या क्रमांकावर येऊन दोन शतके करणारा तो पहिला फलंदाज बनला. तसेच त्याने डी कॉकसह केलेली भागीदारी ही भारताविरुद्धची सर्वात्तम भागीदारी ठरली. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून ही टी20 मधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट






