दक्षिण आफ्रिका संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड मिलर याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. एकवेळ ७ विकेट्स गमावून अवघ्या ६५ धावांवर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने मिलरच्या ताबडतोब खेळीच्या जोरावर १६४ धावांचा डोंगर उभारला. यासह टी२० क्रिकेटमधील एका खास विक्रमाची मिलरच्या नावे नोंद झाली आहे.
पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच केला पराक्रम
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिलरने तब्बल १८८.८९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यादरम्यान त्याने अवघ्या ४५ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा चोपल्या. यासह मिलरने पाकिस्तानविरुद्ध टी२० सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.
मिलरपुर्वी श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल परेराने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टी२० डावात सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी केली होती. २०१३ साली ८४ धावा करत त्याने हा विक्रम आपल्या नावे जमा केला होता. परंतु आता मिलरने परेराला पछाडत या विक्रमात अव्वलस्थानी झेप घेतली आहे. सोबतच त्याने शाकिब अल हसन आणि कोरी अंडरसन यांनाही मागे पाडले आहे.
पाकिस्तानविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज (प्रथम फलंदाजी करताना)-
नाबाद ८५ धावा- डेविड मिलर (२०२१)
८४ धावा- कुशल परेरा (२०१३)
८४ धावा- शाकिब अल हसन (२०१२)
८२ धावा- कोरी एंडरसन (२०१६)
दक्षिण आफ्रिकाचा पाडाव
भलेही मिलरने विक्रमतोड खेळी केली असली, तरी तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १६४ धावा केल्या. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने ४२ धावांची खेळी केली. सोबतच कर्णधार बाबर आझमने ४४ धावांचे योगदान दिले. यासह अवघ्या १८.४ षटकातच पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकाचे १६५ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि ४ विकेट्सने सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनी-साहासोबत पंतची तुलना करणं बंद करा, कारण…” आर अश्विनचे मोठे विधान