क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच वनडे क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दहा संघांच्या होणाऱ्या या स्पर्धेत कोण विश्वचषक उंचावतो याकडे सर्वांची नजर असेल. दरवेळी प्रमाणे यावर्षी देखील दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ हा फेवरेट म्हणून मैदानात उतरेल. मागील विश्वचषकातील खराब कामगिरीला मागे टाकून भारतात आपली कामगिरी उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत कुठपर्यंत मजल मारते, हे त्यांच्या फलंदाजीवर अवलंबून असेल. आणि या फलंदाजीतील महत्त्वाचे नाव असणार आहे अनुभवी डेव्हिड मिलर.
मागील बारा वर्षांपासून भारतातील इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा तो खेळत आलाय. आयपीएल आणि भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा त्याचा दांडगा अनुभव आहे. याच अनुभवाचा फायदा करून घेण्याचा त्याचा आणि दक्षिण आफ्रिका संघाचा देखील प्रयत्न असेल. त्याने आपल्या कारकिर्दीत आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 160 सामने खेळताना 4090 धावा केल्या आहेत. संघाचा फिनिशर ही महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. मात्र, संघाचा डाव गडगडला तर तो देखील सावरण्यास तो पुढे येतो.
मिलर यावेळी आपल्या तिसऱ्या विश्वचषकात खेळताना दिसेल. 2015 मध्ये वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. मागील विश्वचषकात देखील त्याने काही चांगल्या खेळ्या केल्या होत्या. त्याने विश्वचषकात आत्तापर्यंत 14 सामने खेळताना 51.11 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.
मिलर याला भारतातील जवळपास प्रत्येक मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. भारतातील खेळ पट्ट्यांचा त्याला पूर्ण अंदाज असून, खोऱ्याने धावा काढण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करताना दिसेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे यश बरेचदा त्याच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
(David Miller South Africa Hope In 2023 ODI World Cup)
विश्वचषक विशेष-
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद