आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जातोय. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळवण्यात येतोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानला दडपणाखाली ठेवले. त्याचवेळी अफगाणिस्तानचा प्रमुख फलंदाज असलेल्या रहमत शाह याला बाद करण्यासाठी डेव्हिड मिलर याने एक उत्कृष्ट झेल पकडला.
या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानला रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी 41 धावांची चांगली सलामी दिली. मात्र, हे दोघेही याच धावसंख्येवर बाद झाल्याने संघावर दडपण आले. कर्णधार शाहिदी याने देखील केवळ दोन धावा बनवल्या. त्यानंतर रहमत व ओमरजाई यांनी 49 धावांची भागीदारी केली.
रहमत 26 भावांवर असताना लुंगी एन्गिडी याच्या चेंडूवर त्याने पॉईंटच्या दिशेने चौकार वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उभ्या असलेल्या डेव्हिड मिलर याने सरळ हातात आलेला हा चेंडू काहीशा अवघड झेलात बदलला. त्याने तब्बल चार प्रयत्न केल्यानंतर हा झेल पूर्ण केला.
(David Miller Took Stunner Of Rahmat Shah Against Afganistan)
हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?