---Advertisement---

ठरलं! उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध खेळण्यासाठी कुणाचा लागणार नंबर?

Glenn Maxwell Pat Cummins (1)
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिलाला. ऑस्ट्रेलियन संघाने ग्लेन मॅक्सवेल याच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर हा सामना तीन विकेट्स राखून जिंकला. सोबतच या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक हंगामाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

मागच्या सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने उफांत्य फेरीचे तिकिट पक्के केले आहे. उपांत्य सामन्यात आता त्यांच्यापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वनडे विश्वचषक जिंकले आहेत. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ अनेकदा जगज्जेता होण्यापासून चुकला आहे. असे असले तरी, दक्षिण आफ्रिका संघाचा विश्वचषक 2023 हंगामातील फॉर्म जबरदस्त आहे. अशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामना चांगलाच रंगतदार असणार, असेच दिसते.

विश्वचषक हंगामाचे ग्रुप स्टेजचे सामने 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर 16 नोव्हेंबर रोजी होईल. विश्चषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे.

गुणतालिकेचा विचार केला, तर भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाने जागा पक्की केली आहे. चौथ्या क्रमांकावर जो संघ स्थान पक्के करेल, त्याला भारतीय संघाविरुद्ध उपांत्य सामना खेळावा लागणार आहे. यादीतील चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ दावेदार आहेत. हे तिन्ही संघ सध्या अनुक्रमे चार, पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. पुढच्या काही सामन्यांनंतर उपांत्य फेरीत पोहोचणारे चारही सामने समोर येतील. (Australia have qualified for the semi-finals)

महत्वाच्या बातम्या – 
पराभव समोर दिसत असताना मॅक्सवेलने पालटली बाजी! अफगाणिस्तानविरुद्ध बिग शोचे गेम चेंजिंग शतक
वातावरण टाईट! अफगाणी गोलंदाजांनी स्वस्तात तंबूत धाडली आख्खी ऑस्ट्रेलियन बॅटिंग ऑर्डर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---