---Advertisement---

हा विजय मॅक्सवेलचा! डबल सेंच्युरी ठोकत पठ्ठ्यानं अफगाणिस्तानची उडवली धूळधाण

---Advertisement---

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निसटला विजय मिळवला. तीन विकेट्स राखून ऑस्ट्रेलियन संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी (7 नोव्हेंबर) थरारक सामना जिंकला. ग्लेन मॅक्सवेल याला दुखापतीमुळे नीट चालता येत नव्हते. पण तिरीही त्याने खेलपट्टीवर थांबण्याचा निर्णय घेतला आणि 201 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण सुरुवातीच्या विकेट्स झटपट गेल्या आणि संघ चांगलाच अडचणीत आला. संघाची धावसंख्या 91 असताना ऑस्ट्रेलियाने महत्वाच्या सात विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने या सामन्यात 128 छेंडूत 201 धावांची वादळी खेळी केली. यात 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे पॅट कमिन्स याने मॅक्सवेलची साथ देत 68 चेंडू खेलले आणि 12* धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जोडी डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी अनुक्रमे 18 आणि शुन्य धावा करून विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श याने 24, मार्नस लॅबुशेन याने 14, तर यष्टीरक्षक जोश इग्लिस याने शुन्यावर विकेट गमावली. मार्कस स्टॉयनिस (6) आणि मिचेल स्टार्क (3) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. मॅक्सवेलला दीर्घकाळ खेळपट्टीवर उभा राहिल्यामुळे खेळताना त्रास होत होता. एक वेळ अशीही आली की, त्याला खेळपट्टीवर धावने अशक्य झाले. पण तिरीही त्याने मैदान सोडले नाही. कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मॅक्सवेल संघासाठी मॅच विनर ठरला. केवळ एका पायावर भार देऊन खेळत असणाऱ्या मॅक्सवेलने एकापेक्षा एक षटकार आणि चौकार या सामन्यात मारले.

उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकली होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 50 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावा करू शकला. यात सर्वाधिक धावा इब्राहिम जादरान याने केल्या. सलामीवीर फलंदाज इब्राहिमने 143 चेंडूत 129* धावांची अप्रतिम खेळी या सामन्यात केली. ऑस्ट्रेलियासारख्या भेदक गोलंदाजी आक्रमाणाला इप्राहिने अक्षरशः फोडून काढले. इब्राहिमव्यतिरिक्त या सामन्यात एकही अफगाणी फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. शेवटच्या षटकांमध्ये राशिद खान याने 18 चेंडूत 35* धावांची वादळी खेळी मात्र केली.

अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमनतुल्लाह गुरबाझ याने 21, तिसऱ्या क्रमांकावरील रहमत शाह याने 30, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने 26, अजमतुल्ला अरमझाई याने 22, तर मोहम्मद नबी याने 12 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानच्या सर्वाधिक दोन विकेट्स जोश हेजलवूड याने घेतल्या. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झॅम्पा यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. अफगाणिस्तानला या सामन्यात पारभव मिळाला असला, तरी त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा घाम काढला यात कुठलीच शंका नाही. (Maxwell’s double century helped Australia win against Afghanistan)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.

अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---