क्रिकेट विश्वात अशा अनेक घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग 12 हंगामात पाहायला मिळाले. या स्पर्धेतील एका सामन्यात गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यानंतर फलंदाज काही क्षणासाठी जागेवरून हललादेखील नाही. यादरम्यानचा एक व्हिडिओ लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधत आहे.
झाले असे की, बिग बॅस लीग (Big Bash League) स्पर्धेतील 14वा सामना शनिवारी (दि. 24 डिसेंबर) होबार्ड हरिकेन्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स (Hobart Hurricanes vs Melbourne Renegades) संघात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत हरिकेन्स संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांना 18 षटकात सर्वबाद 122 धावाच करता आल्या. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेला फलंदाज कॅलेब ज्वेल (Caleb Jewell) अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला. कॅलेबचा त्रिफळा उडताच तो हैराण झाल्याचे दिसला.
ही घटना पॉवरप्लेनंतर 7व्या षटकात घडली. रेनेगेड्सकडून सातवे षटक टाकण्यासाठी डेविड मूडी (David Moody) खेळपट्टीवर आला होता. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मूडीने ज्वेलला फसवले. यावेळी चेंडू खेळपट्टीवर पडताच थोडा स्विंग झाला. ज्वेलला चेंडू अडवायचा होता, पण त्याला चेंडू समजलाच नाही. चेंडू खेळपट्टीवर पडून गोळीच्या वेगाने यष्टीला जाऊन धडकला. हे पाहून फलंदाज देखील हैराण झाला. बाद झाल्यानंतर जवळपास 5 सेकंद फलंदाज जागेवरून हललादेखील नाही. यावेळी एका क्षणासाठी तो पुतळ्याप्रमाणे दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
SEED. #BBL12 pic.twitter.com/RyZdhBJ7hA
— KFC Big Bash League (@BBL) December 24, 2022
या सामन्यात मूडीने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 16 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अकील हुसेन यानेही रेनेगेड्स संघाकडून शानदार गोलंदाजी केली. अकीलने 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात हरिकेन्स संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रेनेगेड्स संघाला 19.2 षटकात सर्वबाद होत फक्त 114 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना हरिकेन्स संघाने 8 धावांनी आपल्या खिशात घातला. (david moody bowled caleb jewell in big bash league 12 see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला ज्या प्रशिक्षकाने दिले फलंदाजीचे धडे, त्यानेच केली आगपाखड; म्हणाला, ‘हे अस्वीकार्य…’
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला