ऍडलेड। आजपासून(29 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) मैदानावर होत असलेला हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर 1 बाद 302 धावा केल्या आहेत.
यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर(David Warner) आणि मार्नस लॅब्यूशानेने(Marnus Labuschagne) नाबाद शतकी खेळी केली आहे. वॉर्नर 166 धावांवर नाबाद आहे. तर लॅब्यूशाने 126 धावांवर नाबाद आहे.
वॉर्नरचे हे 23 वे कसोटी शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 41 वे शतक आहे. याबरोबरच वॉर्नरने आज 228 चेंडूत 19 चौकारांसह नाबाद 166 धावांची दीडशतकी खेळी करताना अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
वॉर्नरने केले हे खास विक्रम –
#पाकिस्तान विरुद्ध सर्वात कमी डावात 5 कसोटी शतके करणारे फलंदाज –
11 डाव – डेव्हिड वॉर्नर
17 डाव – राहुल द्रविड
19 डाव – पॉलि उम्रीगर, कुमार संगकारा
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू –
71 शतके – रिकी पॉटिंग
41 शतके – डेव्हिड वॉर्नर
40 शतके – मॅथ्यू हेडन
#कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर फलंदाज –
33 – सुनील गावस्कर
31 – ऍलिस्टर कूक
30 – मॅथ्यू हेडन
27 – ग्रॅमी स्मिथ
23 – डेव्हिड वॉर्नर
22 – जॉफ बॉयकॉट, विरेंद्र सेहवाग
#पाकिस्तान विरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर फलंदाज –
5 शतके – सुनील गावस्कर
5 शतके – डेव्हिड वॉर्नर
#2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
9 शतके – रोहित शर्मा
7 शतके – विराट कोहली
6 शतके – डेव्हिड वॉर्नर
बुमराह, चाहरचा समावेश असणाऱ्या या यादीत आता श्रेयस गोपाळचे नावही सन्मानाने घेतले जाणार
वाचा👉https://t.co/lZrNNCKbH8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #HARvKAR #MushtaqAliT20— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
वाचा👉https://t.co/4YtqABX4e8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #abhimanyumithun— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019