सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डविड वॉर्नर याने एक दैदिप्यमान कामगिरी केेली आहे. त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावत मैलाचा दगड पार केेला. अशी कामगिरी करणारा तो जगातील 10वा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरच्या आधी ऑस्ट्रेलिया संघासाठी हा कारनामा रिकी पाँटिंग याने केेला होता. वॉर्नरच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघ या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आला आहे आणि भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. जर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याचा भारताचा मार्ग सुकर होईल.
डेविड वॉर्नर (David Warner) याने जवळपास 3 वर्षांनंतर शतक झळकावले आहे. तो बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याच्या गोष्टी देखील केल्या जात होत्या. मात्र, त्याने शतक झळकावत टीकाकारांचे तोंड बंद केले. मेलबर्नसारख्या कठीण खेळपट्टीवर त्याने आपल्या संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले आणि कसोटी कारकीर्दीत आपल्या 8000 धावा पूर्ण केल्या.
वॉर्नरच्या आधी 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारे फलंदाज
आतापर्यंत 73 खेळाडूंनी कमीत कमी 100 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, त्यापैकी असे 10च खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची कामगिरी केली. इंग्लंडचा कॉलिन कॉड्रे (Colin Cowdrey) हा आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणार पहिला फलंदाज होता आणि तो एखाद्या देशासाठी 100 कसोटी सामने खेळणारा पहिला फलंदाज होता. त्यानंतर पाकिस्तानच्या जावेद मियादाद (Javed Miandad) यांनीही ही कारनामा केला होता. मियादाद यांनी आपल्या पहिल्या आणि 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.
डेविड वॉर्नरचा ही कामगिरी ताजी असतानाच, त्याने आणखी मैलाचा दगड पार केला. त्याने झळकावलेल्या या शतकाचे रुपांतर द्विशतकात केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनला. त्याच्याआधी ही कामगिरी इंग्लंडच्या जो रुट (Joe Root) याने केली होती. रुटनेे भारताविरुद्ध आपला 100वा कसोटी भारताविरुद्ध खेळला. यात त्याने नाबाद 218 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! डेविड वॉर्नरने शंभराव्या कसोटीत झळकावली डबल सेंच्युरी, भीम पराक्रम केला नावावर
आयपीएल 2023 लिलावात 17.50 कोटी मिळवणाऱ्या खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो…’