---Advertisement---

रेकॉर्ड अलर्ट! आयपीएलचा टॉपचा ‘अर्धशतकवीर’ बनला डेविड वॉर्नर, रोहित- विराट जवळपासही नाहीत

David-Warner-Fifty
---Advertisement---

आयपीएल या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये अधिकतर फलंदाज झटपट धावा करण्याला प्राधान्य देतात. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (१० एप्रिल) झालेल्या सामन्यातही दिल्लीच्या फलंदाजांनी ताबडतोब खेळी केल्या आहेत. दिल्लीकडून आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील केवळ दुसराच सामना खेळत असलेल्या सलामीवीर डेविड वॉर्नर याने दमदार अर्धशतक करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात (DC vs KKR) नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम गोलंदाजी निवडली. परिणामी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद २१५ धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने ४५ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकार मारत ६१ धावांची शानदार (David Waner Half Century) खेळी केली.

आयपीएलमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याची वॉर्नरची ही ५५ वी वेळ (Most Times 50 Plus Score In IPL) होती. त्याच्या बॅटमधून आयपीएलमध्ये ५१ अर्धशतके आणि ४ शतके निघाली आहेत. अशाप्रकारे त्याने ५५ वेळा आयपीएलमध्ये धावांची पन्नाशी पार केली आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याच्याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये इतर कोणताही फलंदाज ५० किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आयपीएलमध्ये धावांची पन्नाशी पार करू शकलेला नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज
५५ वेळा- डेविड वॉर्नर
४७ वेळा- विराट कोहली
४६ वेळा- शिखर धवन
४३ वेळा- एबी डिविलियर्स
४१ वेळा- रोहित शर्मा

याखेरीज वॉर्नरने आयपीएलमध्ये कोलकाता संघाविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही सातवी वेळ होती. या कामगिरीच्या बाबतीत त्याने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. तर मिस्टर आयपीएल सुरेश रैना या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने सर्वाधिक ८ वेळा आयपीएलमध्ये हा पराक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारे धुरंधर
८ वेळा- सुरेश रैना
७ वेळा- डेविड वॉर्नर
७ वेळा- रोहित शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

हैदराबादच्या पहिल्या विजयानंतरही संतुष्ट नाही विलियम्सन; म्हणाला, ‘या’ गोष्टीवर आता करावे लागेल फोकस

Video: सूर्यकुमारने करून दिली धोनीची आठवण! हेलिकॉप्टर शॉटने ठोकला तब्बल ९८ मीटरचा षटकार

सलामीवीरांची जोरदार सुरुवात, शार्दुलला सोबतीला घेत अक्षरची प्रॉपर फिनिशिंग; नावे केला ‘अष्टपैलू’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---