---Advertisement---

वॉर्नरचा मोठा विक्रम! संथ अर्धशतकानंतरही आयपीएल इतिहासात ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिला क्रिकेटर

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 10:19 PM
---Advertisement---

दिल्ली। चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ वा सामना बुधवारी (२८ एप्रिल) झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रम केला आहे.

वॉर्नरचा मोठा विक्रम
वॉर्नरने या सामन्यात मनिष पांडेसह शतकी भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. त्याने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. हे वॉर्नरचे आयपीएलमधील ५० वे अर्धशतक ठरले. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात ५० अर्धशतके पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी कोणालाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

विशेष म्हणजे त्याने ५० चेंडूत ५० वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले आहे. तसेच हे त्याचे आयपीएलमध्ये केलेले सर्वात धीमे अर्धशतक ठरले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे क्रिकेटपटू (२८ एप्रिल २०२१ पर्यंत)
५० – डेव्हिड वॉर्नर
४३ – शिखर धवन
४० – विराट कोहली
४० – रोहित शर्मा
४० – एबी डिविलियर्स

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा
वॉर्नरने केवळ ५० अर्धशतकेच नाही तर आयपीएलमध्ये ४ शतकेही केली आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळ ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे. त्याने ५४ वेळा असा कारनामा केला आहे.

त्याच्यापाठोपाठ या यादीत शिखर धवन आणि विराट कोहली संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही प्रत्येकी ४५ वेळा आयपीएलमध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने ४० अर्धशतके तर ५ शतके केली आहेत. तसेच शिखरने ४३ अर्धशतके आणि २ शतके केली आहेत.

हैदराबादचे चेन्नईला १७२ धावांचे आव्हान
बुधवारी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १७१ धावा केल्या. त्यांच्याकडून वॉर्नर व्यतिरिक्त मनिष पांडेने अर्धशतकी खेळी केली. पांडेने ४६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली. तसेच केन विलियम्सनने १० चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी केली. तर केदार जाधवने ४ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.

चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

बापाची वेडी माया! सीएसकेविरुद्धच्या सामन्यात लेकींच्या प्रेमापोटी केलं असं काही, पाहून कराल ‘सलाम’

कौतुकास्पद! पठाण कुटुंबिय पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले धावून, करत आहेत ‘ही’ मदत

मोठी बातमी! ‘शुटर दादी’ देखील अडकली कोरोनाच्या विळख्यात, ट्विटरवरुन दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---