शुक्रवारी(6 नोव्हेंबर) आयपीएल 2020 च्या ‘प्ले ऑफ’ मधील ‘करो या मरो’ च्या सामन्यात म्हणजेच एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करून ‘क्वालिफायर 2’ मध्ये प्रवेश केला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 17 धावांची खेळी केली. या बरोबरच त्याने एका खास विक्रमाच्या यादीत रोहित शर्माला मागे टाकले आहे.
वॉर्नरने बेंगलोरविरुद्ध आयपीएलमध्ये 700 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये बेंगलोरविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहितला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहितने बेंगलोरविरुद्ध 697 धावा केल्या आहेत. तर या यादीत अव्वल क्रमांकावर एमएस धोनी आहे. धोनीने बेंगलोरविरुद्ध 823 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2020 ‘प्ले ऑफ’ मधील ‘करो या मरो’ च्या सामन्यात हैदराबादने बेंगलोरला 6 गडी राखून पराभूत केले आहे. त्यामुळे आता त्यांचा सामना ‘क्वालिफायर 2’ मध्ये दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध होईल.
शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत बेंगलोरने 7 गडी गमावून 131 धावा केल्या. हैदराबादने 6 गडी राखून बेंगलोरने दिलेल्या 132 धावांचे आव्हान पूर्ण केले. हैदराबादकडून वॉर्नर बाद झाल्यानंतर केन विलियम्सनने संघाची जबाबदारी स्विकारत नाबाद 50 धावांची खेळी केली आणि हैदराबादला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
बेंगलोरविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
823 धावा – एमएस धोनी
700 धावा – डेविड वॉर्नर
697 धावा – रोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
सलग १३ व्या वर्षीही RCB च्या पदरी निराशाच, पाहा काय सांगतो इतिहास
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा