मुंबई। बुधवारी (११ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये ५८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीने प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान आणखी पक्के केले आहे.
दिल्लीचा जोरदार जल्लोष
दिल्लीने हा विजय मिळवल्यानंतर जोरदार जल्लोष केला (Victory Celebration). ड्रेसिंग रुममध्ये दिल्लीचा संघ गोलाकार उभा राहून नारेबाजी करताना दिसत आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) चांगलाच जोश पाहायला मिळाला.
यावेळी तो उरी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ‘हाऊज द जोश’ असे म्हणताना दिसत आहे. यावर त्याचे दिल्लीतील संघसहकारी ‘हाय सर’ म्हणत त्याला साथ देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीने सोशल मीडियावर शेअर केला असून त्या व्हिडिओसाठी ‘तुम्ही वाट पाहात असलेला जोश’, असे कॅप्शन दिले आहे.
Just the '𝐉𝐨𝐬𝐡' you were waiting for 💪🔥#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #RRvDC #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @davidwarner31 pic.twitter.com/s6x4rmyR7n
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 11, 2022
दिल्लीच्या विजयात वॉर्नर-मार्शचे मोठे योगदान
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सकडून आर अश्विनने (R Ashwin) ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याला देवदत्त पडीक्कलने चांगली साथ दिली. पडीक्कलने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला २० षटकात ६ बाद १६० धावा करता आल्या. दिल्लीकडून चेतन साकारिया, एन्रीच नॉर्किया आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या (Rajasthan Royals vs Delhi Capitals).
त्यानंतर १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी मिशेल मार्शने (Mitchell Marsh) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ चेंडूत ८९ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने ४ चेंडूत नाबाद १३ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने १८.१ षटकातच २ बाद १६१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्लीचा ६ वा विजय
दिल्लीने बुधवारी आयपीएल २०२२ हंगामातील ६ वा विजय मिळवला आहे. सध्या या ६ विजयांसह ते गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहेत. आता साखळी फेरीतील त्यांचे अद्याप २ सामने बाकी असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना दोन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘बीसीसीआयला भाजप चालवतंय’, खळबळजनक दावा; चर्चांना उधाण
विराटसाठी स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे ‘हे’ चित्र, पाहा नक्की काय आहे कारण