इंडियन प्रीमियर लीगचा विचार जरी केला, तरी समोर आक्रमक फलंदाजीचं एक चित्र उभं राहातं. सध्या याच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. आजपर्यंत आयपीएल स्पर्धेत नेहमीच चौकार-षटकारांची बरसात झालेली पाहायला मिळाली आहे, त्याला आयपीएलचा हा १५ वा हंगामही अपवाद नाही.
आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) बुधवारपर्यंत (११ मे) ५८ सामने खेळले गेले. या ५८ सामन्यांत तब्बल ८३० षटकार (Most Sixes) सर्व संघांतील खेळाडूंनी मिळून ठोकले आहेत, इतकेच नव्हे, तर १६०१ चौकारही (Most Fours) खेळाडूंनी मारले आहेत. या हंगामात सर्वाधिक षटकार आणि चौकार ठोकणारा खेळाडू जोस बटलर (Jos Buttler) आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामात आत्तापर्यंत ५६ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत.
सर्वाधिक षटकार मारणारे संघ
तसेच संघांचा विचार केल्यास ५८ सामन्यांपर्यंत आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक षटकार राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी मारले आहेत. त्याने आत्तापर्यंत एकूण १०८ षटकार ठोकले आहेत. आत्तापर्यंत या आयपीएल हंगामात कोणत्याच संघाला १०० हून अधिक षटकार मारता आलेले नाहीत. त्यांच्या पाठोपाठ या यादीत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी प्रत्येकी ९१ षटकार मारले आहेत.
सर्वाधिक चौकार मारणारे संघ
आयपीएल २०२२ हंगामात ५८ सामन्यांपर्यंत सर्वाधिक चौकार गुजरात टायटन्स संघाने मारले आहेत. त्यांनी १९५ चौकार मारले आहेत. तसेच त्यांच्या पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी १८५ चौकार मारले आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यापर्यंत संघांनी मारलेले चौकार आणि षटकार
चेन्नई सुपर किंग्स – १५२ चौकार, ९१ षटकार
दिल्ली कॅपिटल्स – १८५ चौकार, ९१ षटकार
कोलकाता नाईट रायडर्स – १४९ चौकार, ८९ षटकार
मुंबई इंडियन्स – १४१ चौकार, ७५ षटकार
राजस्थान रॉयल्स – १७१ चौकार, १०८ षटकार
सनरायझर्स हैदराबाद – १३२ चौकार, ७८ षटकार
लखनऊ सुपर जायंट्स – १५९ चौकार, ८१ षटकार
गुजरात टायटन्स – १९५ चौकार, ५८ षटकार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १६१ चौकार, ७७ षटकार
पंजाब किंग्स – १५६ चौकार, ८२ षटकार
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण
प्रेमासाठी काहीही! विराट अनुष्कासाठी चाहत्यांनाही चकमा देत गेला बंगळुरूच्या बेकरीत अन् पुढे…