---Advertisement---

तिसर्‍या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाची लागली आस

On: शनिवार, जानेवारी 2, 2021 9:55 PM
---Advertisement---

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया फलंदाजांना दुसर्‍या सामन्यात जम बसू दिला नव्हता. त्यामुळे आता त्यांना डेविड वॉर्नरच्या परतीची आस लागली आहे, असे मार्नस लॅब्यूशाने म्हणाला आहे.

या मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघावर ऍडलेड येथे 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने मेलबर्न येथे दुसर्‍या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे ही चार सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मात्र, या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी कमकुवत दिसून आली आहे. त्यामुळे मार्नस लॅब्यूशानेने सांगितले आहे की त्यांना स्टार फलंदाज डेविड वॉर्नरनच्या परतीची ओढ लागली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 7 जानेवारी पासून सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी मार्नस लॅब्यूशानेने सांगितले की डेविड वॉर्नर मैदानावर असला की फक्त त्याच्या फलंदाजीनेच नव्हे तर त्याने मैदानावर निर्माण केलेल्या ऊर्जा आणि जोश यांचा संघाला फायदा होतो.

मार्नस लॅब्यूशाने व्हर्च्यूएल पत्रकार परिषदेत म्हणाला, “तो संघात माघारी परतला तर आमच्यासाठी ही खूप मोठी बाब असेल. त्याच्या नावावर 7000 पेक्षा जास्त धावांची नोंद आहे. त्याचबरोबर त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. तो जबरदस्त खेळाडू आहे. तो फक्त फलंदाज म्हणून नव्हे, तर एक खेळाडू म्हणून सुद्धा मैदानावर ऊर्जा आणि जोश निर्माण करतो आणि ते उल्लेखनीय आहे.”

मार्नस लॅब्यूशाने पुढे म्हणाला,”डेविड वॉर्नर गैरहजर असणे हे ऑस्ट्रेलिया संघाला खूप वाईट प्रकारे सलत आहे.” त्याच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशाने आणि टीम पेन यांनी या मालिकेत 23 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.

डेविड वॉर्नरला भारताविरुद्ध वनडे मालिकेतील दुसर्‍या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी-20 मालिकेत सुद्धा सहभागी झाला नव्हता. तसेच तो पहिल्या दोन कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तो’ खेळाडू भारतासाठी पुढील दहा वर्षे खेळेल, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

त्यावेळी सिडनी कसोटीतील द्विशतकी खेळीदरम्यान सचिन तेंडुलकरने ऐकले होते ‘हे’ गाणे

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने निवडला दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ, केवळ ‘या’ एका भारतीयाला दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---