---Advertisement---

AUS vs PAK: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी डावात डेव्हिड वॉर्नर उतरला मैदानात, प्रेक्षकांसह पाकिस्तान संघाने केले मन जिंकणारे कृत्य

On: शनिवार, जानेवारी 6, 2024 8:29 AM
David-Warner-Retirement
---Advertisement---

David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत आहे. सामन्याचा चौथा दिवस सुरू असून, त्यात वॉर्नर शेवटच्या वेळी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीला आले.

याआधी सामन्यात डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 34 धावा केल्या होत्या. वॉर्नर सामन्याच्या चौथ्या डावात मैदानात उतरला, तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा डाव आहे. जेव्हा वॉर्नर मैदानावर आला तेव्हा त्याला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या प्रेक्षकांनी खूप आदर आणि प्रेम दिले आणि विरोधी संघ म्हणजेच पाकिस्तानने देखील, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. (david warner come on filed for his careers last test inning in scg aus vs pak 3rd-test)

वॉर्नर ड्रेसिंग रूममधून फलंदाजीसाठी बाहेर आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. “यावेळी स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर त्याचा सहकारी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आला आणि मैदानावर जाण्यापूर्वी दोघांनी मिठी मारली. त्यानंतर मैदानात गेल्यावर पाकिस्तानी खेळाडूंनी वॉर्नरला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. त्यानंतर वॉर्नरने पाकिस्तानी खेळाडू आणि मैदानी पंचांशी हस्तांदोलन केले.”

शेवटची कसोटी वगळता वॉर्नरने कारकिर्दीत 111 कसोटी सामने खेळले असून शेवटचा सामना त्याच्या कारकिर्दीतील 112 वा कसोटी सामना आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 111 कसोटींच्या 203 डावांमध्ये वॉर्नरने 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. या कालावधीत, ऑस्ट्रेलियन खेळाडूने 26 शतके आणि 36 अर्धशतके केली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 335* होती. वॉर्नरने डिसेंबर 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. याआधी वॉर्नरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले होते. शेवटच्या कसोटीपूर्वी वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. 2023 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. (AUS vs PAK David Warner takes the field in the last Test innings of his career Pakistan team wins hearts with the crowd)

हेही वाचा

BBL 2023-24: बिग बॅश लीगमध्ये घडली मोठी घटना, मेलबर्न स्टार्स विकेटकीपरच्या डोक्याला गंभीर दुखापत
Cricketer of the Year: ICCकडून 2023 ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ खेळाडूंची यादी जाहीर, भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंच्या नावांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---