---Advertisement---

भारीच! डेव्हिड वॉर्नर टी२० क्रिकेट इतिहासात असा कारनामा करणारा जगातील चौथाच क्रिकेटपटू

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 10:48 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये बुधवारी (२८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी अर्धशतके तर, केन विलियम्सनने २६ धावांची खेळी करत संघाला तीन बाद १७१ पर्यंत मजल मारून दिली. या खेळी दरम्यान वॉर्नरने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरला. मात्र, तो नेहमीप्रमाणे फॉर्ममध्ये दिसत नव्हता. तरीही त्याने एक बाजू लावून धरत आयपीएलमधील आपले ५० वे अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याने, ५५ चेंडूत ३ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान वॉर्नरने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ४० वी धाव घेताच वॉर्नरच्या टी२० कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण झाल्या. टी२० क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा तो चौथा चेंडू फलंदाज बनला. आता वॉर्नरच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये १००१७ धावा जमा झालेल्या आहेत.

वॉर्नरने या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघ, आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व सनरायझर्स हैदराबाद, बीबीएलमध्ये सिडनी थंडर्स तर, हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने इतरही काही सघांसाठी आपले योगदान दिले आहे.

या खेळाडूंनी ठोकल्या आहेत टी२० मध्ये १०००० धावा
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. त्याने आत्तापर्यंत ४२२ सामने खेळताना १३८३९ धावा बनविल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर त्याचाच संघ सहकारी कायरन पोलार्ड असून त्याने १०६९४ धावा असून, तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या शोएब मलिकने १०४८८ धावा आपल्या खात्यावर जमा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वॉर्नरचा मोठा विक्रम! संथ अर्धशतकानंतरही आयपीएल इतिहासात ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिला क्रिकेटर

बापाची वेडी माया! सीएसकेविरुद्धच्या सामन्यात लेकींच्या प्रेमापोटी केलं असं काही, पाहून कराल ‘सलाम’

कौतुकास्पद! पठाण कुटुंबिय पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले धावून, करत आहेत ‘ही’ मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---