आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहली याला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्याला सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच विराट आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे, टी२० आणि कसोटी संघात स्थान मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. सोबतच त्याला कसोटीचे कर्णधारपदही मिळाले आहे. विराटच्या या घवघवीत यशानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नर याने हटके अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
वॉर्नरने धारण केले विराटचे रुप
फलंदाजी आणि संघाचे नेतृत्त्व करण्याव्यतिरिक्त वॉर्नरला डान्स करणे, वेगवेगळ्या अभिनेत्यांचे रुप धारण करण्याची आवड आहे. तो सतत सोशल मीडियावर आपले नवनव्या पद्धतीचे व्हिडिओ शेअर करत असतो. विराटला आयसीसीचे पुरस्कार मिळाल्यानंतर वॉर्नरने मजेशीर व्हिडिओ शेअर करत विराटला शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओत विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही क्षण दाखवण्यात आले आहेत. वॉर्नरने या व्हिडिओला एडिट करत विराटच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “कोणीही या आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला ओळखू शकणार नाही.” सोबतच त्याने हसतानाचे इमोजीही दिले आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
भलेही डेविड वॉर्नरला आयसीसीचा एकही पुरस्कार मिळाला नाही; पण आयसीसीने घोषित केलेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे आणि कसोटी संघात त्याला स्थान मिळाले आहे.
https://www.instagram.com/p/CJVlE8ol_jt/?utm_source=ig_web_button_share_sheet
या खेळाडूंना मिळाले आयसीसी पुरस्कार
आयसीसीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीतील कामगिरी पाहिली गेली आहे. तसेच चाहत्यांची मते देखील लक्षात घेण्यात आली आहेत. विराटसह ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगाणिस्तानच्या राशिद खानला मिळाला आहे. याव्यतिरिक्त सहसदस्य देशांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार स्कॉटलंडच्या काईल कोएत्झरला मिळाला आहे.
तसेच सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कार भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मिळाला आहे. धोनीने २०११ च्या नॉटिंगघम कसोटीत धाबबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले होते. त्याबद्दल धोनीला हा पुरस्कार मिळाला आहे.
महिला पुरस्कारांमध्ये एलिसा पेरीने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार पटकावला आहे. एवढेच नव्हे तर पेरीने सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू, सर्वोत्तम महिला टी२० क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळवला आहे. या व्यतिरिक्त सहसदस्य देशांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार स्कॉटलंडच्या कॅथरिन ब्राईसने जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘रनमशीन’ विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
कसोटीत स्टीव्ह स्मिथच भारी! दिग्गजांना पछाडत जिंकला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार