ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (25 ऑक्टोबर) यजमान ऑस्ट्रेलिया व आशियाई विजेते श्रीलंका यांच्या दरम्यान सामना झाला. कोणत्याही परिस्थितीत विजय हवा असलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत श्रीलंकेला 157 धावांवर रोखले. श्रीलंकेच्या डावादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने यादरम्यान केलेल्या एका लाजवाब क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सुरुवात चांगली राहिली. कुसल मेंडीसला बात करण्यात त्यांना यश आले. मात्र, त्यानंतर पथुम निसंका व धनंजय डी सिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेला सामन्यात आणले.
https://twitter.com/W_C_F_C_/status/1584881127323754496?t=YFTK8oyR04xiep0aeOWL8w&s=19
श्रीलंकेच्या डावातील अकरावे षटक अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर फलंदाज धनंजय डी सिल्वाने लॉंग ऑफच्या दिशेने उंचावून फटका मारला. हा चेंडू षटकाराच्या आसपास असताना त्याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या डेव्हिड वॉर्नरने मागच्या दिशेने पळत जाऊन तो चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला. त्याने जवळपास हा झेल पूर्ण केला होता. मात्र, अखेरच्या वेळी आपण सीमापार चाललो आहोत हे लक्षात येताच त्याने चक्क हवेत झेपावत चेंडू पुन्हा मैदानात टाकला. त्यामुळे डी सिल्वा बाद झाला नाही, परंतु, बहुमूल्य चार धावा वॉर्नरने संघासाठी वाचवल्या.
करो अथवा मरो अशा स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र, अखेरच्या दोन षटकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुनरागमन करत संघाला 157 पर्यंत पोहोचवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना