दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी आयपीएलचा 16 वा हंगाम खेळला जात आहे. हंगामातील तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने आले होते. शनिवारी (1 एप्रिल) लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघ 50 धावांच्या अंतराने पराभूत झाला. पराभवानंतर माध्यमांशी बोलताना वॉर्नरने इम्पॅक्ट प्लेअरविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी वॉर्नर या नियमामुळे जास्त खुश असल्याचे पाहायला मिळाले नाही.
इम्पॅक्ट प्लेअरविषयी काय म्हणाला डेविड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे यावर्षी आयपीएल खेळू शकला नाही. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर (David Warner) दिल्लीचे नेतृत्व करत आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात खेळणारा दिल्ली संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. सामना संपल्यानंतर वॉर्नर माध्यमांशी बोलत होता. त्याच्या मते हा इंम्पॅक्ट प्लेअरचा नवीन नियम खूपच कठीण वाटतो. वॉर्नर म्हणाला की, “अनेकदा या नियमामुळे खूप कंफ्यूजन होते आणि यामुळे डोक्याता खूप तान होतो. स्पर्धेसाठी हा नक्कीच एक स्वागतार्ह नियम आहे. एकतर तुम्ही गोलंदाज जास्त खेळवाल किंवा फलंदाज जास्त खेळवू शकता.”
काय आहे नियम
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये लागू करण्यात आलेल्या इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे कोणताही संघ 12 व्या खेळाडूला मैदानात उतरवू शकतो. हा 12 वा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूच्या बदल्यात लाईव्ह सामन्यात सामील होऊ शकतो. दुसरीकडे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झालेला खेळाडू संपूर्ण सामन्यात पुन्हा मैदानात येऊ शकत नाही. तसेच नाणेफएक जिंकल्यानंतर प्लेइंग इलेव्हन जाहीर करताना 5 अतिरिक्त खेळाडूंची यादी देखील कर्णधारांना द्यावी लागत आहे. या पाच खेळाडूंपैकी एक खेळाडू संघ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवू शकतो.
दरम्यान, शनिवारी दिल्ली आणि लखनऊमध्ये झालेल्या या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर ज्याटंसने 6 बाद 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली दिल्ली कॅफिटल्स संघ निर्धारित 20 षटकांमध्ये 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारू शकला. लखनऊच्या विजयात मार्क वूडचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. वूडने टाकलेल्या 4 षटकांमध्ये 14 धावा दिल्या आणि 5 विकेट्स घेतल्या. (David Warner gave a special comment about the impact player rule)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 16.25 कोटींची बोली लागलेला खेळाडू दोन वर्षानंतर बोलला, म्हणाला, “आयपीएलमध्ये पैशाचा दबाव…”
गुजरातच्या आनंदावर विरजण! संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू हंगामातून बाहेर